लई भारी! लग्नाचा डामडाैल बाजूला ठेऊन भालेघरच्या पवार कुटुंबीयांचा गावाच्या विकासासाठी निधी

महेश बारटक्के
Sunday, 10 January 2021

ग्रामस्थांनी पवार कुटुंबियांच्या कृतीचे काैतुक करुन वधू-वरांना आशिर्वाद दिले. 

कुडाळ (जि. सातारा) : आज-काल लग्न समारंभ थाटामाटात साजरा करण्यात अनेकांना धन्यता वाटते. हौसेमौजेच्या नादात अनावश्‍यक खर्चही होतो. मात्र, अशाच गरजेपेक्षा होणाऱ्या अनावश्‍यक खर्चाला फाटा देत भालेघरमधील (ता. जावळी) दिलीप नारायण पवार यांनी मुलीच्या लग्नासाठीचा येणारा अनावश्‍यक खर्च टाळून गावच्या विकासास हातभार लावला आहे. भालेघर येथील मुंबईस्थित दिलीप पवार यांच्या मुलीचा विवाह राजपुरी येथील दिलीप राजपुरे यांचे चिरंजीव रोहित यांच्याशी ठरविण्यात आला होता. 

दोन्ही कुटुंबीयांनी मुलांचे लग्न साधेपणाने करण्याचा निर्णय घेत नोंदणी (रजिस्टर) पद्धतीने विवाह केला. लग्नातील वायफळ खर्च वाचवून पवार कुटुंबीयांनी गावच्या विकासासाठी 21 हजार 111 रुपयांचा निधी देणगी म्हणून दिला. वधू-वरांच्या हस्ते ही देणगी भालेघर उत्सव समितीच्या अध्यक्षांकडे सुपूर्त करण्यात आली.

Makarsankrant Special पतंग उडवा; पण जरा जपूनच  

सामाजिक जाणिवेच्या दातृत्व भावनेतून गावच्या विकासासाठी वेगळा दृष्टिकोन बाळगून दिलीप पवार यांनी सामाजिक बांधिलकीचा आगळा वेगळा आदर्श सर्वांसमोर ठेवला आहे. ग्रामस्थांनी पवार यांच्या कृतीचे काैतुक करुन वधू-वरांना आशिर्वाद दिले. 

Edited By : Siddharth Latkar
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Couple Donated Thousands Of Ruppees For Bhalehar Development Satara News

Tags
टॉपिकस
Topic Tags: