पेट्रोल पंपावरचा एक संवेदनशील कवी...!

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 17 मे 2017

कोल्हापूर - टाकाळ्यावरच्या कृष्णाई पेट्रोकेमिकल्समध्ये हा माणूस कामाला...श्रमगंगेला प्रसन्न करीत संसाराचा गाडा हाकणारा...पण, म्हणून काय झाले? या माणसात प्रतिभा ठासून भरलेली...एखादी कविता सुचली की लगेच कागदावर उतरायची आणि कागद खिशात ठेवून द्यायचा...घरी जावून पुन्हा ती एका वहीत नोंद करायची...अशा एकापेक्षा एक सरस कविता होत राहिल्या आणि त्याचे काव्यसंग्रह बनत गेले. हल्ली काव्यसंग्रहाची दुसरी आवृत्ती निघने म्हणजे दुर्मिळ गोष्ट. मात्र, मांगुलकरांच्या ‘गुंजन’ काव्यसंग्रहाची दुसरी आवृत्ती नुकतीच प्रसिध्द झाली असून तिला वाचकांचा मोठा प्रतिसाद मिळतो आहे. 

मांगुलकरांचं गाव राधानगरीतील पुंगाव. शिक्षण तसं बेताचचं. पण, घरच्या जबाबदारीमुळं नोकरी करणं अपरिहार्य. काम करत करतच जेंव्हा जेंव्हा कविता सुचल्या त्या लिहून ठेवल्या. काही कविता जवळ पेन नसतानाही सुचल्या. पण, अशावेळी समोरच्या व्यक्तीकडून पेन मागून घेवून त्यांनी त्या कागदावर टिपून ठेवल्या. ‘आयुष्य खूप सुंदर आहे. ते आणखी सुंदर करा. या आयुष्यात करण्यासारखं खूप काही आहे...’ अशी त्यांच्या नसानसात भिणलेली सकारात्मक मानसिकता आणि त्यामुळेच या माणसाच्या मनातील शब्दांचा उमाळा थांबता थांबत नाही. मात्र, एका विशिष्ट टप्प्यावर आणखी किती दिवस या कविता कपाटात धूळ खात ठेवणार ? काही कविता तर हरवल्या, असा विचार मनात आला आणि कवितासंग्रहाचा निर्णय पक्का झाला. त्यातून पहिला कवितासंग्रह जन्माला आला तो ‘मनमौजी’. तसा आर्थिकदृष्ट्या हा त्यांचा धाडसी निर्णय, पण समाजात चांगुलपणाला नेहमीच साथ मिळते, याचा अनुभव त्यांनाही आला. सिंधुताई सपकाळ यांच्या हस्ते त्यांच्या या संग्रहाचे प्रकाशन झाले. त्यांनी दुसरं धाडस केलं ते ‘गुंजन’ या कवितासंग्रहाचे आणि या संग्रहालाही मोठा प्रतिसाद मिळाला. ज्येष्ठ साहित्यिक श्‍याम कुरळे, जॉर्ज क्रूझ, व्ही. एस. पाटील (बेलेकर) यांचे सहकार्य मिळाले. सर्वात खमके पाठबळ मिळाले ते कृष्णाई पेट्रोकेमिकल्स आणि परिवाराचे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dattatray Mangallar Sensitive poet