ऑनलाइन शिक्षणाची मजबुरी, गरीब विद्यार्थ्यांसाठी धावली 'ग्रामपरी'

सूर्यकांत पवार
Sunday, 11 October 2020

शासनाने ऑनलाइन शिक्षणावर भर दिला असला तरी अजूनही दुर्गम भागातील विद्यार्थी व शाळांना ऑनलाइन शिक्षणात अडचणी येत असल्याची बाब लक्षात घेऊन कास पठाराच्या पश्‍चिमेला असलेल्या डोंगरमाथ्यावरील जिल्हा परिषदेच्या गेळदरे, कुसुंबीमुरा, सांगवीमुरा, शिंदेवस्ती, पाटणेमाची, म्हातेमुरा, गाळदेव, भोगवलीमुरा, रेंगडीवाडी व रेंगडीमुरा या शाळांतील प्रत्येकी एका विद्यार्थ्यास मोबाईलचे वाटप करण्यात आले आहे.

कास (जि. सातारा) : कोरोना महामारीमुळे सहा महिन्यांपासून शाळा बंद आहेत. शासनाने ऑनलाइन शिक्षणावर भर दिला असला तरी अजूनही दुर्गम भागातील विद्यार्थी व शाळांना ऑनलाइन शिक्षणात अडचणी येत असल्याची बाब लक्षात घेऊन पाचगणी येथील ग्रामपरी या सामाजिक संस्थेने गटविकास अधिकारी सतीश बुद्धे व गटशिक्षणाधिकारी कल्पना तोडरमल यांच्या पुढाकाराने या सह्याद्रीच्या डोंगर माथ्यावरील दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना नुकतेच स्मार्ट मोबाईलचे वाटप केले. 

कास पठाराच्या पश्‍चिमेला असलेल्या डोंगरमाथ्यावरील जिल्हा परिषदेच्या गेळदरे, कुसुंबीमुरा, सांगवीमुरा, शिंदेवस्ती, पाटणेमाची, म्हातेमुरा, गाळदेव, भोगवलीमुरा, रेंगडीवाडी व रेंगडीमुरा या शाळांतील प्रत्येकी एका विद्यार्थ्यास मोबाईलचे वाटप "ग्रामपरी'चे गणेश पुजारी, संजय बिरामणे, विशाल बगाडे या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आले. 

खासदार पाटलांचा पाठपुरावा, कऱ्हाडला श्वापद उपचार केंद्र मंजूर

गेळदरे शाळेच्या मुख्याध्यापिका माधुरी दळवी यांनी स्वागत व सत्कार केले. विद्यार्थी संकेत कोकरे व पालक प्रदीप पाटणे यांनी, तर शिक्षकांच्या वतीने सचिन बोराटे यांनी मनोगत व्यक्त केले. केंद्रप्रमुख मिलिंद जगताप यांनी कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या, तर संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी मुलांना मार्गदर्शन केले. सचिन बोराटे यांनी सूत्रसंचालन केले. सुनील जांभळे यांनी आभार मानले. ही मदत मिळवून देण्यासाठी गटविकास अधिकारी बुद्धे, गटशिक्षणाधिकारी तोडरमल, विस्तार अधिकारी श्री. कर्णे यांनी विशेष प्रयत्न केले. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Distribution Of Mobiles To Students In Kas Area Satara News