डॉ. पोळ यांचे गिनेस वर्ल्ड रेकॉर्ड

इंडियाना - प्राध्यापक डॉ.विलास गणपत पोळ यांनी सिरॅमिक टाइलवर पिरिऑडिक टेबलच्या घटकांची अचूक मांडणी विक्रमी वेळेत करून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड केला.
इंडियाना - प्राध्यापक डॉ.विलास गणपत पोळ यांनी सिरॅमिक टाइलवर पिरिऑडिक टेबलच्या घटकांची अचूक मांडणी विक्रमी वेळेत करून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड केला.

पुणे - अमेरिकेतील पर्ड्यू विद्यापीठ इंडियाना येथे केमिकल इंजिनिअरिंग विभागात कार्यरत असलेले प्राध्यापक डॉ. विलास गणपत पोळ यांनी १५ ऑगस्टला अनोख्या पद्धतीने भारतीयांचा झेंडा जागतिक स्तरावर फडकविला. प्राध्यापक पोळ यांनी आवर्त सारणी म्हणजेच पिरिऑडिक टेबलमधील सर्व मूलभूत रासायनिक घटकांची विशिष्ट आणि गुंतागुंतीच्या पद्धतीची मांडणी सर्वांत कमीत कमी वेळात करून नवा गिनेस वर्ल्ड रेकॉर्ड केला. त्यांनी एका मोठ्या सिरॅमिक टाइलवर पिरिऑडिक टेबलच्या सर्व घटकांची अचूक मांडणी अवघ्या आठ मिनिटे आणि ३६ सेकंदांत केली.  

डॉ. पोळ यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून रसायनशास्त्रात एम.एस्सी.एम फिल. आणि इस्राईलमधील बार इलान विद्यापीठातून पीएच.डी.पदवी मिळवली आहे. ते मध्य प्रदेशातील इंदूरच्या आयआयटीमध्ये सहायक प्राध्यापक म्हणून काम करत आहेत. तसेच आयआयटीच्या पीएचडी पदव्युत्तर संशोधकांना मार्गदर्शन करतात. त्यांची पत्नी डॉ. स्वाती पोळ यादेखील पर्ड्यू विद्यापीठात शास्त्रज्ञ पदावर काम करत आहेत. त्यांनी त्यांचे पती विलास आणि मुलांना गिनेस वर्ल्ड रेकॉर्डच्या कथा वाचण्यासाठी पुस्तके भेट दिली होती. त्यातून त्यांना ही प्रेरणा मिळाली. 

ते स्वतः रसायनशास्त्रज्ञ असल्याने पिरिऑडिक टेबलमधील घटकांच्या मांडणीवर गिनेस वर्ल्ड रेकॉर्डसाठी तयारी करण्याचा त्यांनी निर्णय घेतला. गिनेस वर्ल्ड रेकॉर्डच्या व्यवस्थापनाने हे रेकॉर्ड करण्यासाठी विशिष्ट पद्धतच हवी, अशी अट घातली. त्यानुसार प्रत्येक सिरॅमिक टाइल्सवर (दोन बाय दोन इंच) पिरिऑडिक टेबलमधील घटकांची चिन्हे लिहून अशा टाइल्सचा एक ढीग करण्यात आला. त्यानंतर त्या ढिगातील अशा सिरॅमिक टाइल्स पिरिऑडिक टेबलची कोणतीही बाह्यरेषा दिलेली नसताना, योग्य रीतीने मांडाव्यात आणि कुठल्याही दोन टाइल्समधे अंतर अथवा फट न ठेवता ही मांडणी करावी, हे आव्हान निश्‍चित केले. पोळ यांनी हे आव्हान केवळ आठ मिनिटे आणि ३६ सेकंदांत पूर्ण केले.

या विक्रमासाठी मी तीन आठवडे पिरिऑडिक टेबलमधील घटकांच्या मांडणीचा सराव केला. पिरिऑडिक टेबल हा नवीन संशोधनाचा पाया आहे. मानवी शरीरात पिरिऑडिक टेबलमधील सुमारे ३० घटक असतात. तर स्मार्ट फोनमध्ये सर्व आवश्‍यक चुंबकीय, ऑप्टिकल व कार्यन्वयन प्रणाली मिळविण्यासाठी ७५ घटक (११८ घटकांपैकी) आहेत. या घटकांमुळेच स्मार्ट फोन आपल्यापेक्षा हुशार ठरण्यास कारणीभूत आहेत.
- डॉ. विलास पोळ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com