दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांसाठी मोफत खानावळ

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 11 मार्च 2019

बारामती - इस्माचे अध्यक्ष, जिल्हा परिषदेचे सदस्य रोहित पवार यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील दुष्काळग्रस्त व होतकरू विद्यार्थ्यांसाठी मोफत खानावळीची (मेस) सुरवात केली आहे. त्याचा फायदा मराठवाडा व दुष्काळी भागातील ४० विद्यार्थ्यांना पुढील दोन महिने होणार आहे.  

रोहित पवार यांनी महिला दिनाचे औचित्य साधून या योजनेची सुरवात केली. या संदर्भात काही विद्यार्थ्यांनी पवार यांना माहिती दिली होती. दुष्काळी भागातील विद्यार्थ्यांच्या भोजनाचा खर्चाचा भार त्यांच्या कुटुंबीयांवर पडू नये, यासाठी

रोहित पवार यांनी सृजन अभियानामार्फत ही जबाबदारी घेतली. या पूर्वी रोहित पवार यांनी १५० विद्यार्थ्यांसाठी सृजनच्या माध्यमातून मोफत मेसची योजना सुरू केली होती. याखेरीज २०१५ मध्येही मराठवाड्यातील बारामतीत शिकत असलेल्या विद्यार्थिनींचा भोजन व इतर खर्चाची जबाबदारी घेऊन रोहित पवार यांनी त्यासाठी २५ लाखांची तरतूद केली होती. 

पुण्यातील या भेटीवेळी आकाश झांबरे, ऋषीकेश जगदाळे, ओम कट्टे, शिवराज कुंभार, नंदकुमार हांगे, कृणाल सपकळ आदींसह इतरही विद्यार्थी उपस्थित होते.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Drought Affected Student Free mess Rohit Pawar