शिक्षणासाठी २०० शेतकरीपुत्रांचे पालकत्व

सूरज पाटील
मंगळवार, 26 जून 2018

यवतमाळ - गेल्यावर्षी ३१ विद्यार्थ्यांना दत्तक घेतल्यानंतर यंदा २०० शेतकरी  पाल्यांचे पालकत्व घेऊन त्यांचे अभियांत्रिकीचे स्वप्न पूर्ण करण्यात येणार आहे. शेतकरीपुत्रांचे शिक्षण अर्धवट राहू नये, यासाठी पुणे येथील नोईंग गांधीझम ग्लोबल फ्रेंड्‌स, युवा मेळघाट या तरुणांच्या व्हॉट्‌स ॲप ग्रुपमार्फत हा उपक्रम राबविण्यात येत आहे. 

यवतमाळ - गेल्यावर्षी ३१ विद्यार्थ्यांना दत्तक घेतल्यानंतर यंदा २०० शेतकरी  पाल्यांचे पालकत्व घेऊन त्यांचे अभियांत्रिकीचे स्वप्न पूर्ण करण्यात येणार आहे. शेतकरीपुत्रांचे शिक्षण अर्धवट राहू नये, यासाठी पुणे येथील नोईंग गांधीझम ग्लोबल फ्रेंड्‌स, युवा मेळघाट या तरुणांच्या व्हॉट्‌स ॲप ग्रुपमार्फत हा उपक्रम राबविण्यात येत आहे. 

शेतकऱ्यांना नापिकी, कर्जबाजारीपणा यासह विविध संकटांना सामोरे जावे लागते. आर्थिक परिस्थितीअभावी शेतकऱ्यांच्या मुलांना शिक्षण अर्ध्यावर सोडून देण्याची वेळ येते.  अन्नदात्यासाठी अन्नत्याग आंदोलन केल्यानंतर राज्यासह जपानमधून प्रतिक्रिया आल्या. शेतकऱ्यांसाठी काही तरी केले पाहिजे, यावर सर्वांनी एकत्र येऊन विचारमंथन केले. या ग्रुपमध्ये ४५ सक्रिय तरुणांचा सहभाग आहे. कर्जाच्या ताण घेऊन जगणाऱ्या शेतकऱ्यांना मुलांच्या शिक्षणाची चिंता कायम सतावत राहते. शेतकरी पाल्य अभ्यासात हुशार असूनही त्यांना केवळ पैशाअभावी स्वप्न गुंडाळून ठेवावे लागते. मुलाला शिक्षण देऊ शकलो नाही, या अपराधीपणाच्या भावनेतून शेतकरी आत्महत्या झाल्या आहेत. भूमिपुत्राच्या घरात ज्ञान, विज्ञान आणि तंत्रज्ञान हा सुवर्ण त्रिकोण पोहोचविण्याचे ध्येय या ग्रुपने उराशी बाळगले आहे. या शैक्षणिक सत्रात २०० गरजू, गरीब शेतकऱ्यांच्या पाल्यांची अभियांत्रिकी पदवी, पदविका जबाबदारी नोईंग गांधीझम ग्लोबल फ्रेंड्‌स या ग्रुपने उचलली आहे. होतकरू व गरीब विद्यार्थ्यांनी नागपूर, पुणे येथे अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश घेतल्यानंतर ९० टक्के शैक्षणिक शुल्क, वसतिगृहाची सुविधादेखील उपलब्ध करून देणार आहे. 

 पैशाच्या समस्येमुळे गरीब शेतकरी मुले शिक्षणापासून वंचित राहू नये, यासाठी यंदा २०० विद्यार्थ्यांच्या अभियांत्रिकी प्रवेश व वसतिगृहाचा खर्च आम्ही करणार आहोत. यासाठी पुणे येथील काही दात्यांनी मदतीचा हात पुढे केला. गरजूंनी आमच्या ग्रुपशी संपर्क साधावा. 
- संकेत मुणोत, नोईंग गांधीझम ग्लोबल फ्रेंड्‌स, पुणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: education 200 farmer son Guardianship motivation initiative