‘अभियंता ते अभिनेता’ वेबसीरिज

सकाळ वृत्तसेवा
Monday, 25 November 2019

पुणे - अभियंत्यांमधील कलागुणांना वाव देण्यासाठी ‘अभियंता ते अभिनेता’ ही वेबसीरिज साकारली जात आहे. ‘इन्फिनिटी इंजिनिअरिंग ॲकॅडमी’तर्फे हा नवीन उपक्रम राबविण्यात आला आहे. यानिमित्त कलाकारांसाठी स्पर्धेचे आयोजन केले होते. 

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

स्पर्धेमध्ये पाच विजेत्यांची निवड करण्यात आली. प्रथम क्रमांकास रोख रकमेचे बक्षीस देण्यात आले. प्रथम पारितोषिक संकेत कार्जुले, द्वितीय आशिष बाली, तृतीय रामदास टेकाळे, चतुर्थ अभिषेक काळे आणि पाचवे पारितोषिक देवयानी कुतवळ यांनी पटकाविले. याप्रसंगी ॲकॅडमीचे संचालक गिरीश खेडकर, स्वप्नील भोर, दिग्दर्शक अशोक पालवे आदी होते.

 या वेळी खेडकर म्हणाले, ‘‘अभियांत्रिकेच्या विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षांबाबत जागृती निर्माण करण्यासाठी ‘यूट्यूब चॅनेल’ सुरू केले आहे. या वेब सीरिजसाठी २४ जणांची निवड केली आहे. अभियांत्रिकीमधील स्पर्धा परीक्षांची माहिती, परीक्षेचा अर्ज कसा भरायचा, परीक्षेची तयारी कशी करायची यासह प्रशासकीय अधिकाऱ्यांचे व्हिडिओ या चॅनेलद्वारे दाखविण्यात आले आहे.’’
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Engineer to actor WebSeries