मजुराची मुलगी झाली अधिकारी

धनाजी पाटील
रविवार, 12 मे 2019

पुनाळ - उचित ध्येय व महत्त्वाकांक्षा असेल तर असाध्य गोष्टीही साध्य होतात. याचंच उदाहरण कळे (ता. पन्हाळा) येथील ऊसतोडणी मजुराच्या मुलीने खरं करून दाखवलं. कोणतीही शैक्षणिक पार्श्वभूमी नसताना, कोणाचेही मार्गदर्शन नसताना स्वबळाच्या जोरावर मिळवलेलं यश नक्कीच तरुण पिढीला प्रेरणादायी ठरेल. अंकिता शंकर बोरगे असे तिचे नाव आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्याच्या आलेल्या परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात राज्य कर सहायकपदी निवड झाली. या परीक्षेत ती राज्यात पासष्टावी आली. अल्पभूधारक असणारे हे कुटुंबाने तुटपुंजी शेती व जनावरांच्या जोरावर संसार उभा केला. आई शेतावर राबायची व बाप ऊस तोडायला जायचा हे अंकिता जवळून पाहायची.

मुळात वाचनाची आवड असलेल्या अंकिताचे प्राथमिक शिक्षण मरळी (ता. पन्हाळा) येथील प्राथमिक शाळेत झाले. कळेतील विठ्ठल पाटील महाविद्यालयात माध्यमिक तर कुडित्रे येथील श्रीराम महाविद्यालयात व न्यू कॉलेज येथून महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले. शिकवणी लावू शकत नसल्याची जाणीव होती. अंकिताने शिलाई काम करत सोशल मीडियाच्या आधारे अभ्यास करून पहिल्याच प्रयत्नात २०० पैकी १०२ गुण मिळवत राज्यात पासष्टावी आली.

मरळी येथील प्राथमिक शाळेत असताना अनंत गुरव हे शिक्षक स्पर्धा परीक्षेतून नायब तहसीलदार झाले. गावातील राजश्री देसाई या मुख्य कार्यकारी अधिकारी झाल्या. त्याचा आदर्श डोळ्यांसमोर होता. त्यामुळेच यशस्वी झाले.
- अंकिता बोरगे, विद्यार्थिनी

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: farm labors girl Ankita Borge success in MPSC