#ThursdayMotivation : शेतकऱ्याचा मुलगा झाला "आयईएस'

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 31 ऑक्टोबर 2019

शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, औरंगाबाद येथून "इलेक्‍ट्रॉनिक अँड टेलिकम्युनिकेशन'मधून इंजिनिअरिंगची पदवी मिळविली. काही दिवसांतच त्यांना परदेशातील इंविडीया प्रा. लिमिटेड या नामांकित कंपनीत नोकरी मिळाली. परंतु, रुपेशला देशसेवेची आवड असल्याने त्यांनी आपली नोकरी सांभाळून भारतीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी केली. भारतीय अभियांत्रिकी सेवेकरिता अत्यंत कठीण समजल्या जाणाऱ्या "आय.ई.एस.' परीक्षेत ते उत्तीर्ण झाले. 

यवतमाळ - संघ लोकसेवा आयोगाकडून घेण्यात येणाऱ्या देशपातळीवरील "भारतीय अभियांत्रिकी सेवा' (आय.ई.एस.) ही अत्यंत कठीण समजली जाणारी परीक्षा दारव्हा येथील रूपेश देवराव चिरडे यांनी यशस्वीपणे उत्तीर्ण केली आहे. त्यांचा देशातून 95 वा क्रमांक आला आहे. त्यांचे सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे. 

दारव्हा शहरातील रामनगर (बारीपुरा) येथील कष्टकरी शेतकरी देवराव चिरडे यांचा रूपेश हा मुलगा. रूपेश यांचे शिक्षण शेतकरी व सर्वसामान्य कुटुंबात झाले. ते शालेय जीवनापासूनच एक हुशार विद्यार्थी म्हणून सर्वांना परिचित आहेत. एडेड हायस्कूल, दारव्हा येथून त्यांनी दहावी 81.60 टक्‍के गुण मिळवून उत्तीर्ण केली. तर, शिवाजी विज्ञान महाविद्यालय, दारव्हा येथून बारावीत 93 टक्‍के गुण मिळविले. त्यानंतर उच्च शिक्षण शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, औरंगाबाद येथून "इलेक्‍ट्रॉनिक अँड टेलिकम्युनिकेशन'मधून इंजिनिअरिंगची पदवी मिळविली. काही दिवसांतच त्यांना परदेशातील इंविडीया प्रा. लिमिटेड या नामांकित कंपनीत नोकरी मिळाली. परंतु, रुपेशला देशसेवेची आवड असल्याने त्यांनी आपली नोकरी सांभाळून भारतीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी केली. भारतीय अभियांत्रिकी सेवेकरिता अत्यंत कठीण समजल्या जाणाऱ्या "आय.ई.एस.' परीक्षेत ते उत्तीर्ण झाले. 

"अभ्यासात सातत्य ठेवले व कठोर परिश्रम घेतले तर कोणत्याही परीक्षेत यश मिळविणे कठीण नसते. कोणत्याही परीक्षेची तयारी करताना यशस्वी विद्यार्थ्यांचे अनुभव जाणून घेऊनच तयारीला सुरुवात करावी.' 
-रूपेश देवराव चिरडे, आयईएस. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Farmers son becomes IES Success Motivation