esakal | माणला दुसर्‍या लाटेचा जोरदार तडाखा; 'माणदेश'कडून लाखमोलाची मदत
sakal

बोलून बातमी शोधा

Mandeshi Foundation

कोरोना केअर सेंटरमध्ये आजही कोरोनाबाधित उपचार घेत आहेत. त्यातच तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेऊन ही सर्व सेंटर लढाईस सज्ज आहेत.

माणला दुसर्‍या लाटेचा जोरदार तडाखा; 'माणदेश'कडून लाखमोलाची मदत

sakal_logo
By
रुपेश कदम

दहिवडी (सातारा) : नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या माणदेश फाउंडेशन पुणे (Mandeshi Foundation Pune) व केअरिंग फ्रेंड्स मुंबई (Caring Friends Mumbai) या संस्थांनी माण तालुक्यातील चार कोविड सेंटरना (Covid Center) प्रत्येकी एक लाख रुपये देवून लाखमोलाची मदत केली आहे. माण तालुक्याला कोविड-१९ च्या पहिल्या लाटेपेक्षा दुसर्‍या लाटेचा जोरदार तडाखा बसला आहे. कोरोनाबाधितांची संख्या व उपलब्ध खाटांची संख्या यांचा मेळ बसत नव्हता. त्यामुळे दहिवडी, गोंदवले, म्हसवड, वरकुटे-मलवडी आदी ठिकाणी नव्याने कोरोना केअर सेंटर तसेच कोविड हाॅस्पिटल (Covid Hospital) उभारण्यात आली. (Financial Support To Covid Center From Mandeshi Foundation And Caring Friends Satara Positive News)

शासकीय मदतीसोबतच सामाजिक कार्यकर्ते, संस्थांनी यात पुढाकार घेतला. जरी दुसरी लाट ओसरु लागली असली तरी यातील बहुतांशी कोरोना केअर सेंटरमध्ये (Corona Care Center) आजही कोरोनाबाधित उपचार घेत आहेत. त्यातच तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेऊन ही सर्व सेंटर लढाईस सज्ज आहेत. अतिशय चांगले काम करणाऱ्या या सेंटरना मदतीसाठी व्यक्ती तसेच संस्था मदतीसाठी पुढे येत आहेत. माणमधील विविध सामाजिक कामांना लाखो रुपयांची मदत मिळवून देणारे अतिरिक्त आयकर आयुक्त मुंबई नितीन वाघमोडे यांनी पुन्हा एकदा मदतीसाठी पाऊल उचलले. त्यांच्या पुढाकाराने माणदेश फाउंडेशन पुणे व केअरिंग फ्रेंड्स मुंबई यांच्यातर्फे चैतन्य गोंदवले बुद्रुक, आम्ही म्हसवडकर म्हसवड, जनसेवा सेंटर म्हसवड व संकल्प सेंटर वरकुटे मलवडी या चार कोरोना केअर सेंटरना प्रत्येकी एक लाख रुपये अशी चार लाख रुपयांची भरीव मदत देण्यात आली. या मदतीमुळे अतिशय समर्पित भावनेने काम करणाऱ्या या सेंटरना मोलाची मदत झाली आहे.

हेही वाचा: वाह, क्या बात है! जावळीत महिलांनी सुरू केली स्वस्त धान्य दुकानं

सदर मदतीचे धनादेश माजी आयुक्त प्रभाकर देशमुख, आयकर आयुक्त नितीन वाघमोडे यांच्या हस्ते व उपसभापती तानाजी कट्टे, माणदेश फाउंडेशन पुण्याचे अध्यक्ष विजयराज पिसे, उपाध्यक्ष प्रवीण काळे, विश्वस्त अशोक माने, अभिजीत माने, अभयसिंह जगताप, संदीप सुळे यांच्या उपस्थितीत देण्यात आले. तसेच विजय पोरे यांनी दोन तर ललिता बाबर व डाॅ. संदीप भोसले यांनी एक काॅन्संट्रेटर मशीन आम्ही म्हसवडकर व चैतन्य कोविड सेंटरला दिली आहे.

Financial Support To Covid Center From Mandeshi Foundation And Caring Friends Satara Positive News

loading image
go to top