जखीणवाडीमध्ये मोफत ऑक्‍सिजनची सोय : ऍड. नरेंद्र पाटलांचा पुढाकार

राजेंद्र ननावरे
Saturday, 12 September 2020

जखीणवाडी येथील ऍड. नांगरे-पाटील विविध कामांत अग्रसेर असतात. गावात त्यांनी अनेक उपक्रम राबवले आहेत. त्यांची तिसरी पिढी जखीणवाडीत कार्यरत आहे. ऍड. पाटील यांनी राज्यात आदर्श जखीणवाडी बनवली आहे. कोरोना महामारीतही गरजूंसाठी स्वखर्चातून ऑक्‍सिजन किट खरेदी केले.

मलकापूर (जि. सातारा) : बेड मिळत नाही, ऑक्‍सिजनही उपलब्ध नाही, ही गोष्ट लक्षात घेऊन सामान्यांची ऑक्‍सिजनची गरज पूर्ण करता येईल, यासाठी जखीणवाडी येथील ऍड. नरेंद्र पाटील यांनी ऑक्‍सिजन मशीन खरेदी केली असून, गरजूंना ते मोफत पुरवणार आहेत.
 
कोरोनाचा प्रादुर्भाव आणि काही रुग्णांना ऑक्‍सिजनची गरज भासू लागल्याने ऍड. पाटील यांनी ऑक्‍सिजन मशिन खरेदी केली आहे. त्याद्वारे गावातील लोकांना ऑक्‍सिजनची गरज लागल्यास ते त्वरित सोय करत आहेत. परवा रात्री बेघर वस्तीत मध्यरात्री साडेतीन वाजता एका ज्येष्ठास धाप लागली. त्या काळोख्या रात्रीत पाटील यांनी ऑक्‍सिजनची सोय केली. वेळेत ऑक्‍सिजन मिळाल्याने त्यांच्या तब्येतीत सुधारणा झाली.

तासवडे औद्योगिक वसाहतीमधील मुरूम उत्खनन कारवाई संशयाच्या भोवऱ्यात? 

जखीणवाडी येथील ऍड. नांगरे-पाटील विविध कामांत अग्रसेर असतात. गावात त्यांनी अनेक उपक्रम राबवले आहेत. त्यांची तिसरी पिढी जखीणवाडीत कार्यरत आहे. ऍड. पाटील यांनी राज्यात आदर्श जखीणवाडी बनवली आहे. कोरोना महामारीतही गरजूंसाठी स्वखर्चातून ऑक्‍सिजन किट खरेदी केले. मशिन गावातील ग्रामस्थांसह कोणत्याही गरजूला विनामूल्य उपलब्ध ठेवले आहे. पहिल्याच दिवशी बेघर वसाहतीतील एका ग्रामस्थाचे प्राण वाचण्यात यश आले. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Free Oxygen Kit To Patients At Jakhinwadi Satara News