कोल्हापूर जिल्ह्यातील ६७ शाळांमध्ये फुलणार परसबाग

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 25 मार्च 2019

म्हाकवे - शालेय पोषण आहारासाठी लागणारा भाजीपाला विषारी खतापासून मुक्त असावा व तो सहज उपलब्ध व्हावा, या हेतूने परसबाग फुलवण्याचा प्रयोग प्राथमिक शिक्षक विभागाने हाती घेतला आहे. पूर्णपणे सेंद्रिय व कंपोस्ट खतांच्या वापरातून हा भाजीपाला पिकवला जाणार आहे. जिल्हा परिषद कोल्हापूर आणि रिलायन्स फाऊंडेशन (मुंबई) यांच्यावतीने हा उपक्रम राबवण्यात येत आहे.

म्हाकवे - शालेय पोषण आहारासाठी लागणारा भाजीपाला विषारी खतापासून मुक्त असावा व तो सहज उपलब्ध व्हावा, या हेतूने परसबाग फुलवण्याचा प्रयोग प्राथमिक शिक्षक विभागाने हाती घेतला आहे. पूर्णपणे सेंद्रिय व कंपोस्ट खतांच्या वापरातून हा भाजीपाला पिकवला जाणार आहे. जिल्हा परिषद कोल्हापूर आणि रिलायन्स फाऊंडेशन (मुंबई) यांच्यावतीने हा उपक्रम राबवण्यात येत आहे.

पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील ६७ शाळांमध्ये पारसबाग फुलणार असून पहिली परसबाग बानगे (ता. कागल) येथील प्राथमिक शाळेत पूर्णत्वास आली आहे. टप्प्याटप्प्याने एक हजार शाळांमध्ये हे परसबागा फुलवण्याचा जिल्हा परिषदेचा निर्धार आहे. ज्या शाळांकडे परसबागेसाठी जागा उपलब्ध आहे तेथे नांगरट माती टाकणे, संरक्षक कुंपण घालणे यासारखे उपक्रम विद्यार्थी सहभागातून राबवण्यात येत आहेत. केवळ ३० बाय ३० फूट जागेचा वापर करत पावसाळ्यापुर्वी या बागेची तयारी करण्यात येणार आहे. सभोवती कुंपण घातले जाणार आहे. जून महिन्यात बियाणांची पेरणी करण्यात येईल.

बागेसाठी सेंद्रिय खते, शेण, राख याचा वापर केला जाणार आहे. जमिनीचा पोत सुधारणे, पाण्याची बचत, मातीची धूप रोखणे, जलधारणशक्ती वाढविणे, अशा विषयांवर तज्ज्ञ व्याख्याते, डॉक्‍टरांकडून व्याख्याने, मार्गदर्शन शिबिरे घेण्यात आली आहेत. पपई व शेवगा मधल्या टप्प्यात वांगी टोमॅटो मध्यभागी भाजीपाला पिकवला जाणार आहे. परसबागेचे काम केंद्रशाळा बानगे येथे पूर्ण केले. 

व्हर्टीकल गार्डन संकल्प -
जिल्ह्यात तीन हजार ५८ शाळा असून यापैकी एक हजार शाळांकडे मैदान उपलब्ध आहे. तर उर्वरित शाळांकडे पुरेशी जागा नसल्याने व्हर्टीकल गार्डन संकल्पनेतून भाज्या पिकविल्या जाणार आहेत. टब किंवा सिमेंट पोत्यामध्ये माती भरून वेलीवर येणाऱ्या शेंगांचे पीक घेतले जाणार आहे. कार्यालय आवार, जिन्या शेजारील जागा, पाण्याची टाकी अशा परिसरात असे पीक घेता येऊ शकते. असे जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभाग शालेय पोषण आहारच्या अधिकारी वर्षा परीट यांनी सांगितले.

प्राथमिक शिक्षण विभागाने शाळा तेथे हे परसबाग हा उपक्रम हाती घेतला आहे. याला मोठ्या प्रमाणात जिल्ह्यातून प्रतिसाद मिळत आहे. हे पहिल्या टप्प्यात ६७ परस बागांचे काम हाती घेण्यात आले असून या उपक्रमात कोल्हापूर जिल्हा परिषदेने राज्यात आघाडी घेतली आहे.
- अंबरिशसिंह घाटगे, 

शिक्षण सभापती जिल्हा परिषद, कोल्हापूर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Garden development in 67 schools in Kolhapur Disitrict