व्हॉट्‌सअॅप ग्रुपच्या माध्यमातून मुलीचा शोध

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 23 जून 2018

रहिमतपूर - रहिमतपुरातील रोकडेश्वर गल्लीतील धनुषा जगन्नाथ माने ही अडीच वर्षांची मुलगी बाजारादिवशी दुपारी गांधी चौकातून हरविली. विठ्ठल हणमंत साठे यांना ती सापडली. त्यांनी चौकशी करून धनुषाला रहिमतपूर पोलिस ठाण्यात पोचवले. 

या घटनेची माहिती मिळताच सहायक पोलिस निरीक्षक घनश्‍याम बल्लाळ व सहकऱ्यांनी गांभीर्य ओळखून ‘रहिमतपूर बीट १००’ या नावाने काही दिवसांपूर्वीच व्हॉट्‌सॲप ग्रुपवर लहान मुलगी हरविल्याचे निवेदन दिले होते. त्यानुसार रहिमतपूर पोलिस ठाण्याशी संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले होते. एका तासातच धनुषाला आपल्या आई-वडिलांच्या ताब्यात देण्यात आले. 

पोलिसांनी सोशल मीडियाचा चांगला वापर केल्याबद्दल वरिष्ठांकडून रहिमतपूर ठाण्याचे कौतुक करण्यात आले. घनश्‍याम बल्लाळ, महिला हवालदार आर. बी. परदेशी, ए. ए. चव्हाण, पोलिस नाईक जगदीश कणसे, संतोष नाळे, सचिन राठोड, महेश पवार, विनोद पवार, हवालदार विजय जाधव यांनी तपासात योगदान दिले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: girl search by whatsapp group