‘एनएसएस’च्या विद्यार्थ्यांचे पूरग्रस्तांसाठी भरीव कार्य

Great work for flood victims of NSS students
Great work for flood victims of NSS students

पुणे - पुरामुळे घरे पडली, धीरही गमावला होता. या अवस्थेतही महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकडून कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्तांना उमेद तर मिळालीच. पण, त्यांनी केलेल्या सर्वेक्षणामुळे बाधित घरांच्या संख्येत सरकारी आकड्यांपेक्षा अठरा टक्‍क्‍यांनी वाढ झाली आणि त्या नागरिकांना सरकारची मदतही मिळाली.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेत काम करणाऱ्या पुणे, नगर आणि नाशिक जिल्ह्यांतील पूरग्रस्त दोन जिल्ह्यांतील अकिवाट, बस्तवाड, राजापूर, राजापूरवाडी, दानवड नवे, दानवड जुने, खिद्रापूर यांसह दहा गावांमध्ये जाऊन मदत कार्य केले. आठवड्याभराच्या श्रमदानानंतर ते बुधवारी पुण्यात परतले. या वेळी विद्यार्थ्यांनी त्यांचे अनुभव सांगितले. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, प्र-कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य राजेश पांडे, प्रसेनजीत फडणवीस, डॉ. संजय चाकणे, विद्यार्थी विकास मंडळाचे डॉ. सदानंद भोसले, डॉ. प्रभाकर देसाई उपस्थित होते. या विद्यार्थ्यांचा सन्मानही करण्यात आला. विद्यार्थ्यांनी त्यांचे अनुभव सांगितले. ते म्हणाले, की घरांच्या पडझडीचे सरकारी यंत्रणेने पंचनामे केले, ते कमी भरले. सर्वेक्षण केल्याने या संख्येत वाढ झाली. आम्ही एक हजार २७४ घरांचे पंचनामे केले. बाधितांना मदत मिळाली, अशी माहिती दिली. पुरामुळे लोकांना भोगाव्या लागलेल्या त्रासाचे, कौटुंबिक अडचणीचे चित्र कथनातून उभे केले. 

आम्हाला या उपक्रमातून आपत्तीच्या काळात कसे खंबीर व्हावे, आपत्तीचे नियोजन कसे करावे, याचे शिक्षण मिळाले. या मदतकार्यात मुलींचाही सहभाग मोठा होता. घरापासून कधी दूर राहिलो नाही; पण या मदतकार्यामुळे माणुसकीची नवी दृष्टी मिळल्याने त्या म्हणाल्या.

पांडे म्हणाले, ‘‘विद्यार्थ्यांनी संवेदनशीलता दाखविली.  हीच संवेदना इतर विद्यार्थ्यांमध्ये रुजावी, यासाठी कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांत गेलेल्या विद्यार्थ्यांचे अनुभवकथन ‘जागर संवेदनेचा’ या उपक्रमातून प्रत्येक महाविद्यालयांत आयोजित केले जाणार आहे. तसेच विद्यापीठातील मदतकार्य पोचविलेल्या दहा गावांमधील सरपंच आणि ग्रामसेवक यांना विद्यापीठात बोलावून विद्यार्थ्यांसमवेत त्यांची कार्यशाळा घेतली जाणार आहे.’’

कोल्हापूर, सांगलीतील पूरग्रस्तांना मदत करून 
समाज उभारणीच्या कामात तुम्ही सहभाग दिला आहे. हे एक प्रकारचे मूल्य शिक्षण आहे. या मदतकार्यादरम्यान तुम्ही वेगळे अनुभव घेतले असतील, ते लिहून काढा. तुमच्या मागे असलेल्या विद्यार्थ्यांना यातून प्रेरणा मिळावी म्हणून या  अनुभवाची पुस्तिका तयार केली जाईल.
- डॉ. नितीन करमळकर, कुलगुरू, सावित्रीबाई फुले विद्यापीठ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com