दिव्यांग राजूला मोटारसायकल

संतोष काळे
बुधवार, 23 जानेवारी 2019

राहू - रोजच्या रोज खोदकाम, चिखल-माती, दगडधोंड्यांशी रोज नित्याचा सामना त्याला करावा लागतो. पोटाची खळगी आणि घरची चूल कशी पेटणार, त्यात दोन्ही पायाने अपंगत्व असणाऱ्या राजू कुऱ्हाडे या दिव्यांगाला पिलाणवाडी (ता. दौंड) येथील रामदास ट्रान्सस्पोर्टचे उद्योजक विलास कदम पाटील परिवारातर्फे चारचाकी मोटारसायकल मोफत भेट देण्यात 
आली. 

सहा महिन्यांपूर्वी राजू हा कदम कुटुंबीयांच्या शेतातील विहिराचे काम घेण्यासाठी गेला होता. त्याच्याकडे पाहून तो हे काम करील किंवा नाही, याची शाश्‍वती (खात्री) कदम कुटुंबीयांना नव्हती. त्याच्या कामाची गरज, तळमळ, जिद्द, चिकाटी आणि कष्टाच्या जोरावर त्यांने दिव्यांग असूनदेखील दिलेल्या वेळेच्या अगोदर काम प्रमाणिकपणे पूर्ण केले. त्यांच्या या प्रामाणिकपणाबद्दल श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखान्याचे संचालक रामदास ट्रान्सस्पोर्टचे मालक पांडुरंग कदम, पोलिस पाटील लक्ष्मण कदम, विलास कदम, माउली कदम, नवनाथ कदम परिवाराच्या वतीने राजूला चारचाकी मोफत मोटारसायकल दिली.

सायकलचे वाटप आमदार राहुल कुल यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी विठ्ठल कदम, अक्षय कदम, बाबूराव कदम आदी उपस्थित होते. राजू हा परिसरातील शेतकऱ्यांच्या पाइपलाइन, लिकेज, विहीर खोदाईची कामे आजही करतो.

मी जरी दोन्ही पायाने अपंग असलो तरी माझ्याकडे जिद्द, चिकाटी आहे. चारचाकी मोटारसायकल मिळाल्याने मी आणि माझे कुटुंब खूप आनंदी आहे. मोटारसायकलवरून मी आणि माझे कुटुंब कामाला जात आहे. मी आणखी यापुढे कष्ट करतच राहणार आहे.
- राजू कुऱ्हाडे, खोदाई कामगार

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Handicapped Raju Kurhade Motorcycle gift by Vilas Kadam Motivation