दृष्टिहीन प्रांजल पाटील यांची सहाय्यक जिल्हाधिकारीपदी नियुक्ती

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 29 मे 2018

जळगाव - जिल्ह्यातील मूळ रहिवासी असलेल्या आयएएस प्रांजल पाटील यांची सहाय्यक जिल्हाधिकारी पदावर केरळमधील एर्नाकुलम येथे नियुक्ती झाली आहे. २०१५-१६ च्या आयएएस असलेल्या प्रांजल प्रज्ञाचक्षू असून, वर्षभर मसुरी येथील प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांची नियुक्ती झाली आहे. दरम्यान, आज त्यांनी या पदाचा कार्यभार स्वीकारला. 

प्रांजल पाटील या जळगाव जिल्ह्यातील बोदवड तालुक्‍यातील रहिवासी असून, त्या जन्मापासूनच प्रज्ञाचक्षू आहेत. प्रतिकूल स्थितीत पदवी, पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी कठोर परिश्रम घेत केंद्रीय लोकसेवा आयोगाची (युपीएससी) परीक्षा उत्तीर्ण होत आयएएस झाल्या. २०१५-१६मधील बॅचच्या आयएएस असलेल्या प्रांजल यांनी मसुरीत नुकतेच प्रशिक्षण पूर्ण केले. या प्रशिक्षणानंतर त्यांची पहिली नियुक्ती एर्नाकुलम येथे झाली असून वर्षभर परिविक्षाधीन अधिकारी म्हणून या पदावर त्या राहतील. नंतर त्यांची जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती होईल.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: IAS Pranjal Patil select to Assistant Collector motivation