धारावीतील उद्योग इंटरनेटवरून 

किरण कारंडे : सकाळ वृत्तसेवा 
शुक्रवार, 6 जानेवारी 2017

अमेरिकेतील तंत्रज्ञानाचा आता मुंबईमध्ये धारावीतील कुंभारवाडा, लेदर मार्केट आणि कपड्यांच्या मार्केटसाठी वापर... 

भारतात पहिल्यांदाच बिकन तंत्रज्ञानाचा वापर; ब्ल्‌यूटूथची किमया 

मुंबई : जगभरातील देशांत एकसमान पातळीवर तंत्रज्ञानाचा प्रयोग फिजिकल वेब तंत्रज्ञानाच्या निमित्ताने होत आहे. अमेरिकेत ऍमस्टरडॅम महापालिकेने सुरू केलेल्या तंत्रज्ञानाचा वापर आता मुंबईमध्ये धारावीतील कुंभारवाडा,लेदर मार्केट आणि कपड्यांच्या मार्केटसाठी होणार आहे."बिकन' तंत्रज्ञानाचा वापर करून इंटरनेटद्वारे व्यवसाय अधिक सोपा होणार आहे. 
बिकन हे ब्ल्यूटूथ असलेले उपकरण असून त्याची बॅटरी चार वर्षे टिकते. या उपक्रमात मोबाईल ऍपचाही वापर होणार आहे. बिकन आणि ऍप्लिकेशनद्वारे धारावीतील व्यवसायाची उलाढाल आणखी वाढवण्याचा प्रयत्न करण्यात येईल, असे चिन्मय परब याने सांगितले. चिन्मय मुंबई आयआयटीतील इंडस्ट्रीअल डिझाईन सेंटरच्या (आयडीसी) पदव्युत्तर अभ्यासक्रमाला शिकत आहे.

अशा प्रकारचे तंत्रज्ञान"इंटरनेट ऑफ थिंग्ज' या संकल्पनेशी संबंधित आहे. अनेक गोष्टी, गॅजेट्‌स इंटरनेटद्वारे जोडणे ही"इंटरनेट ऑफ थिंग्ज'ची संकल्पना आहे. तंत्रज्ञानावर आधारित  ई-कॉमर्सची मक्तेदारी वाढत असतानाच छोटे दुकानदार आणि व्यावसायिकांनाही स्थिर होण्याची संधी मिळणे आवश्‍यक आहे, असे चिन्मयला वाटते. इंटरनेटचा वापर करून हे छोटे व्यावसायिक, उद्योजक व दुकानदार आपला व्यवसाय आणखी व्यापक करू शकतात. यासाठी बिकन तंत्रज्ञान उपयुक्त ठरेल. 

असा आहे वापर 
धारावीसारख्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर व्हॉट्‌सऍप मार्केटिंगला बिकन तंत्रज्ञान उत्तम पर्याय ठरेल. व्हॉट्‌सऍपसारखे तंत्रज्ञान या ठिकाणी सहज वापरण्यात येत आहे. त्यामुळेच WeDharavi हे ऍप्लिकेशन सहज वापरणे शक्‍य होईल. बिकन हार्डवेअरचा वापर केल्याने परिसरातील 60 फुटांपर्यंतच्या परिसरात आपल्या व्यवसायाशी संबंधित वेबसाईट वापरकर्त्यांना दिसते. ब्ल्यूटूथ आणि स्मार्टफोनवर आपल्या लोकेशनचा पर्याय यासाठी ऍक्‍टिव्ह असावा लागतो. वायफायनंतर आता पुन्हा ब्ल्यूटूथचे तंत्रज्ञान तेजीत येईल. 

एकाच वेळी अनेक देशांत अभ्यास"

इंटरनेट ऑफ थिंग्ज'अंतर्गत चिन्मयने धारावीचा प्रकल्प अभ्यासासाठी घेतला आहे. याच वेळी ऍमस्टरडॅम, नैरोबी आणि इंग्लंडमध्ये ही हा 
अभ्यास सुरू आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून उद्योगांना बिकन तंत्रज्ञान कसे उपयुक्त ठरते, याचा हा अभ्यास आहे. सध्या"गुगल'ने भारतातील प्रकल्पासाठी शंभर बिटन 
अभ्यासासाठी पुरवले आहेत. अमेरिकेत बिकन तंत्रज्ञानाची किंमत सहा ते आठ डॉलर आहे. 

मुंबई : आयआयटीचा विद्यार्थी चिन्मय परब आणि त्याच्या टीमने धारावीतील चामडे उद्योगातील व्यावसायिकांसाठी तयार केलेले अद्ययावत ऍप्स. 
 

 
 

Web Title: Internet industry Dharavi