esakal | अकरा ऑक्‍सिजन मशिनसह जनता बॅंकेची टीम कार्यरत
sakal

बोलून बातमी शोधा

अकरा ऑक्‍सिजन मशिनसह जनता बॅंकेची टीम कार्यरत

सातारा शहर व परिसरात ऑक्‍सिजन मशिनची गरज असणाऱ्या रुग्णांनी व त्यांच्या नातेवाईकांनी बॅंकेचे अध्यक्ष अतुल जाधव यांच्याशी (मो. क्र. 9767499223) संपर्क साधावा, असे आवाहन शाहूपुरी शाखेचे कार्याध्यक्ष नंदकुमार सावंत व बॅंकेचे उपाध्यक्ष बाळासाहेब गोसावी यांनी केले आहे.

अकरा ऑक्‍सिजन मशिनसह जनता बॅंकेची टीम कार्यरत

sakal_logo
By
दिलीपकुमार चिंचकर

सातारा : साहित्यसेवेचा वारसा घेऊन काम करतानाच सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शाहूपुरी शाखेने जनता सहकारी बॅंकेच्या सहकार्याने कोरोनाच्या संकटात अत्यवस्थ असलेल्या रुग्णांसाठी तब्बल 11 ऑक्‍सिजन मशिन उपलब्ध केल्या आहेत. जनता सहकारी बॅंकेमार्फत त्या रुग्णांना उपलब्ध करून देण्यात येत आहेत. अशा प्रकारचा उपक्रम राबवणारी शाहूपुरी शाखा ही महाराष्ट्रातील एकमेव साहित्य संस्था ठरली आहे, अशी माहिती शाहूपुरी शाखेचे अध्यक्ष विनोद कुलकर्णी यांनी दिली.
 
कोरोना रुग्णांमध्ये ऑक्‍सिजनची पातळी कमी होण्याची समस्या निर्माण होते. त्यानंतर रुग्णालयात बेड मिळेपर्यंत रुग्ण जीवन-मृत्यूशी झुंज देत असतो. त्या कालावधीत त्याला ऑक्‍सिजनची गरज असते. ही गरज ओळखून "मसाप'ची शाहूपुरी शाखा आणि जनता सहकारी बॅंकेने एकत्रित येत देणगीदारांच्या सहकार्याने 11 ऑक्‍सिजन मशिन घेतल्या असून ती सातारकर जनतेच्या सेवेसाठी उपलब्ध केली आहेत. ही सर्व मशिन रुग्णांना देण्यासाठी जनता बॅंकेची टीम कार्यरत राहील. 24 तास लोकांसाठी बॅंकेची टीम काम करेल.

आता राज्यातील मराठा समाजाच्या नजरा पुन्हा उदयनराजेंकडे
 
ही ऑक्‍सिजनची मशिन घेण्यासाठी प्रशांत सावंत, संतोष चौगुले, रोहित कुऱ्हाडे, अमर मोरे, गणेश चौगुले, विनायक इथापे, ऍड. राहुल खैरमोडे, नगरसेवक मनोज शेंडे, शिवाजी वर्णेकर, सागर लाहोटी, महेश शिंदे, आनंदराव कणसे, जयेंद्र चव्हाण आणि जनता सहकारी बॅंक कर्मचारी संघाचे सहकार्य लाभले आहे.

शिवेंद्रसिंहराजे समर्थकांचे बायोमायनिंग प्रकल्पाविरोधात आंदोलन
 
साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, जिल्हा प्रतिनिधी रवींद्र बेडकिहाळ यांच्या मार्गदर्शनाखाली काम करताना साहित्य परिषदेने हा उपक्रम राबवला आहे. सातारा शहर व परिसरात ऑक्‍सिजन मशिनची गरज असणाऱ्या रुग्णांनी व त्यांच्या नातेवाईकांनी बॅंकेचे अध्यक्ष अतुल जाधव यांच्याशी (मो. क्र. 9767499223) संपर्क साधावा, असे आवाहन शाहूपुरी शाखेचे कार्याध्यक्ष नंदकुमार सावंत व बॅंकेचे उपाध्यक्ष बाळासाहेब गोसावी यांनी केले आहे.

Edited By : Siddharth Latkar

loading image
go to top