चिमुकल्या जुळ्यांचं मजेशीर जीवनशिक्षण 

चिमुकल्या जुळ्यांचं मजेशीर जीवनशिक्षण 

जर्मनीतील लेवरकुसान शहरात किआन आणि कबीर या चिमुकल्या जुळ्यांचं मजेशीर जीवनशिक्षण चाललेलं आहे. हसतखेळत व्यायाम, बागकाम, गाणं आणि खाणं यांतून नकळतच दोघांना आरोग्य आणि आनंदी राहण्याचं बाळकडू मिळतं आहे. आई श्‍वेता आणि बाबा केतन कुलकर्णी हे या दोघांना नवनवीन गोष्टी शिकवत असतात. तसंच ते दोघे या दोघांकडूनही काही शिकत असतात. 

अजाण आणि सुजाण अशा चौघांचं मिळून जर्मनीतल्या लेवरकुसान शहरातलं घर म्हणजे दिवसभर नुसती धमाल. किआन व कबीर हे अडीच वर्षे वयाचे जुळे भाऊ आणि त्यांचे आई-बाबा म्हणजे श्‍वेता आणि केतन कुलकर्णी मिळून इथं एकमेकांकडून काही तरी शिकत असतात. श्‍वेता म्हणाली, ""मी आणि केतन मेकॅनिकल इंजिनिअर आहोत. दहा वर्षांपासून जर्मनीत राहात आहोत. व्यावसायिक कामांची प्रचंड धावपळ असली तरी मुलांसाठी आम्ही जास्तीत जास्त वेळ देतो.

घरातली कामं आम्ही दोघे बरीच वर्षं वाटून घेऊन करतो. त्यात आता किआन आणि कबीरही सहभागी होतात. छोट्याशा व्हॅक्‍यूम क्‍लिनरने त्यांची खोली स्वच्छ करायला त्यांना फार आवडतं. घरापुढच्या बागेतला पाचोळा गोळा करणं आणि तो डब्यात भरतानाही त्यांना मजा वाटते. स्वयंपाकघरात तर त्यांना नुसता ऊत येतो. भाज्यांच्या ट्रे काढला की, दोघेही समोर डिश ठेवून टोमॅटो, काकडी अशी वर्गवारी करून भाज्या बाजूला ठेवतात. भाज्यांचे रंग, रूप, आकार, वास या दोघांच्या मनावर हाताळणीतून ठसत आहेत. तयार केल्यावर सर्व प्रकारच्या भाज्या खातात. चव आवडल्याचं स्वर आणि अविर्भावातून सांगतात. मी एखाद्या पदार्थाची पूर्वतयारी करत असताना त्यांचं बारीक लक्ष असतं. आता आपण अमुक-अमुक पदार्थ भाज्या. "अरे वा. कसा मस्त वास सुटलाय, "वगैरे मी त्यांच्याशी बोलते. कमी-जास्त, थोडं-फार, लहान-मोठं, वर-खाली असा फरक दिवसभरातल्या निरनिराळ्या कामासंबंधी बोलताना त्यांना समजू लागला आहे.'' 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

श्‍वेताने असंही सांगितलं की, घर लहान असलं तरी बाल्कनी मोठी असल्याने आम्ही सकाळी तिथे व्यायाम करतो. त्यात आम्ही कंटाळा केला तर मुलं आम्हाला ओढून नेतात. त्यांच्या उड्या आणि पळापळीत आमचं पाहून-पाहून जंपिंग जॅक्‍स तसंच स्क्वॅटस्‌ यांची भर पडली आहे. पांढरी वाळू बाल्कनीत ठेवली आहे. तिचा किल्ला, बोगदा किंवा सुचतील ते वेगवेगळे आकार करणं हा त्यांना आणि आम्हालाही भुलवणारा खेळ आहे. रोज आम्ही शारीरिक आणि बुद्धीला चालना देणारे रंजक खेळ खेळतो. सगळे मिळून गाणी गातो. चित्रं रंगवणं, लपाछपी आणि नवेच त्यांनी शोधलेले खेळ यात दिवस कसा संपतो ते समजतही नाही. या अजाण मुलांकडून आम्ही बरंच काही शिकत असतो. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com