esakal | कोरोनामुळं घरातील कर्त्या पुरुषांचं निधन; चार मुलांना 'माई'चा आधार
sakal

बोलून बातमी शोधा

Mai Charitable Trust

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेकांना प्राण गमवावे लागले आहेत. काही घरांतील कर्त्या पुरुषाचे निधन झाले आहे.

कोरोनामुळं घरातील कर्त्या पुरुषांचं निधन; चार मुलांना 'माई'चा आधार

sakal_logo
By
गजानन गिरी

मसूर (सातारा) : कोरोनाच्या (coronavirus) दुसऱ्या लाटेत अनेकांना प्राण गमवावे लागले आहेत. काही घरांतील कर्त्या पुरुषाचे निधन झाले आहे. अशाच प्रकारे सुर्ली व किरोली (ता. कोरेगाव) येथील दोन कुटुंबांतील कर्त्या पुरुषांचे निधन झाले. त्यामुळे किवळ (ता. कऱ्हाड) येथील माई चॅरिटेबल ट्रस्टने (Mai Charitable Trust) या कुटुंबांतल्या चार मुलांचे पालकत्व स्वीकारून त्यांच्या शैक्षणिक खर्चाचा वाटा उचलण्याची जबाबदारी घेतली आहे. मुलांच्या शैक्षणिक पालकत्वाचा उपक्रम राबवण्याचा संकल्प ट्रस्टच्या संस्थापक अध्यक्षा संगीता साळुंखे (President Sangeeta Salunkhe) यांनी केला आहे. त्यांचा हा उपक्रम एक आदर्शवत ठरला आहे. (Mai Charitable Trust Accepted Responsibility For The Education Of Four Children bam92)

सुर्ली व किरोली गावांतील कुटुंबांतील कर्त्या पुरुषांचे कोरोनाने निधन झाले. कुटुंबांची आर्थिक स्थिती हलाखीची असल्याने मुलांचे पुढील शिक्षण शक्य नव्हते. मुले शिक्षणात हुशार असल्याने त्यांच्या पुढील शिक्षणात खो बसू नये, या विचाराने ट्रस्टच्या अध्यक्षा साळुंखे यांनी मुलांच्या शाळेत जाऊन त्यांची माहिती घेतली व मुलांच्या शिक्षणाचा खर्च उचलला. ट्रस्टने यापूर्वीही अनेक सामाजिक उपक्रम राबवले आहेत. गोरगरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप, त्यांची शैक्षणिक जबाबदारी, शिक्षणासाठी त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन, समाजातील गरजू महिलांना समुपदेशन व मार्गदर्शन करण्याची भूमिकाही ट्रस्टने स्वीकारली आहे.

हेही वाचा: नेटवर्कअभावी ऑनलाइन शिक्षणाचा बट्ट्याबोळ

मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी सामाजिक विचाराने घेतली आहे. या विचारानेच इतर सामाजिक संस्थांनी, संघटनांनी हुशार, गरजू मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी उचलावी. या मुलांनीही पुढे हाच विचार राबवावा.

-संगीता साळुंखे, संस्थापक अध्यक्षा, माई चॅरिटेबल ट्रस्ट

Mai Charitable Trust Accepted Responsibility For The Education Of Four Children bam92

loading image