हाताला बोटे नसतानाही मनोज कुंभार घडवतात गणरायाच्या मूर्ती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

हाताला बोटे नसतानाही मनोज कुंभार घडवतात गणरायाच्या मूर्ती

हाताला बोटे नसतानाही मनोज कुंभार घडवतात गणरायाच्या मूर्ती

बारामती - एखादी गोष्ट करण्याची मनात जिद्द असेल तर येणाऱ्या प्रत्येक अडचणीवर मात करून माणूस ध्येय निश्चितीकडे वाटचाल करत राहतो. बारामतीतील मनोज कुंभार (Manoj Kumbhar) यांचीही कहाणी (Story) काहीशी अशीच....अनेकांना प्रेरणा देणारी अन् परिस्थितीवर मात करून ध्येयपूर्ती करता येते याचे मूर्तिमंत उदाहरण नजरेसमोर ठेवणारी.

बारामतीतील एका कुंभार व्यावसायिक कुटुंबात मनोज यांचा जन्म झाला. पण नियतीने त्यांच्या पुढ्यात काही वेगळेच वाढून ठेवले होते. जन्मतः त्यांच्या दोन्ही हातांना बोटेच नव्हती. निसर्गाने एक गोष्ट हिरावून घेतली असली तरी दुसरीकडे मनोज यांना चांगली कलाही उपजतच दिली. मातीच्या मूर्ती घडवणाऱ्या कुंभारांच्या घरात जन्म झाला आणि जन्मापासूनच मातीशी मनोज यांची नाळ जोडली गेली. वडील मातीपासून मूर्ती तयार करताना पाहून एक दिवस त्यांनीही दोन हत्तीच्या मूर्ती साकारल्या. त्यांच्या हातातील कला पाहून आई वडीलही चकित झाले.

हेही वाचा: संरक्षण मंत्र्यांच्या हस्ते होणार सुवर्णपदक विजेता नीरज चोप्राचा सत्कार

मनोज यांच्या बोटांच्या समस्येमुळे शाळेतही त्यांना प्रवेश मिळत नव्हता पण अखेर त्यांना प्रवेश मिळाला. निसर्गाने बोटे दिली नाहीत पण बोटांशिवाय चित्र काढण्याची कला दिली. त्यांनी यावर मात करत स्वावलंबी बनण्याचा संघर्ष सुरु केला. या प्रवासात त्यांना अनेकदा नैराश्य आले पण त्यांनी जिद्द सोडली नाही. त्यांची ही जिद्द पाहून बारामतीतील विद्या प्रतिष्ठान संस्थेने इंग्रजी शाळेत कलाशिक्षक म्हणून उत्तम पगाराची नोकरी देऊ केली. आजही गणेशोत्सवात मनोज यांचे हात गणरायाची मूर्ती सुबकपणे घडविताना थकत नाहीत. समाजोपयोगी काहीतरी करावे या उद्देशाने मनोज कुंभार व विनोद खटके या दोघांनी मिळून प्रतिबिंब हे युट्यूब चॅनेल सुरु केले. त्याच्यावरही प्रेरणादायी बाबी दाखविण्याचा त्यांचा प्रयत्न असतो.

मी आयुष्यात खूप काही कमावले आहे किंवा खूप यशस्वी व्यक्ती झालोय असे नाही, पण अवहेलनेच्या छातीवर जिद्दीने उभा राहिलोय, माझ्या अपंगत्वालाच माझे शक्तिस्थळ बनवून वाटचाल करीत आहे.

- मनोज कुंभार

Web Title: Manoj Kumbhar Ganpati Idol

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Manoj Kumbhar
go to top