धान्य व्यवसायाला दिली अत्याधुनिकतेची ‘झालर’ - प्रवीण पगारिया

धान्य व्यवसायाला दिली अत्याधुनिकतेची ‘झालर’ - प्रवीण पगारिया

ई-मेल, फेसबुकद्वारे ऑर्डर मिळविण्यावर भर

आजोबा, वडिलांचा पारंपरिक धान्य विक्रीचा व्यवसायाला आधुनिकतेची जोड देत ई-मेल, फेसबुकवर धान्याची ऑर्डर मिळविण्यापर्यंत धान्य विक्रीच्या व्यवसायात अत्याधुनिकपणा आणला आहे. धान्य व्यापाऱ्यांना मॉल संस्कृतीला तोंड देण्यासाठी अपडेट व्हावे लागणार आहे.  ‘मॉल’शी स्पर्धा करताना धान्याची चांगली प्रतवारी, लहान पॅकिंगमध्ये उपलब्धता, ग्राहकांशी सुसंवादावर अधिक भर देणार असल्याची माहिती, मे.उत्तमचंद दगडूलाल पगारिया फर्मचे संचालक दाणा बाजार व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष प्रवीण पगारिया यांनी दिली.

धरणगाव माझ्या आजोबा (कै.)उत्तमचंद पगारिया यांचे गाव. ते १९५५ ला जळगावला आले. १९५७ मध्ये त्यांनी उत्तमचंद दगडूलाल पगारिया नावाने लहानसे किराणा दुकान दाणाबाजारात सुरू केले. त्याकाळी गहू, ज्वारी, भरडधान्याची विक्री होत असे. वडील सुभाष पगारिया यांनी हा व्यवसाय सांभाळला. त्यावेळी मोठे तराजू काट्यावर धान्य मोजले जात असे. जुन्या पारंपरिक साधनांनी व्यवहार होत असे. मी बी.कॉम. होऊन ‘एमबीए’चे शिक्षण जळगाव येते घेत असताना वडिलांच्या मदतीला दुकानावर १९९० पासून यायला लागलो. वडिलांची ग्राहकांशी बोलण्याची पद्धती, माल विकतानाचा संवाद मी ऐकत असे. अत्याधुनिक पद्धतीने वडिलांचा धान्य विक्रीचा व्यवसाय पुढे नेण्याचा निर्धार केला. घेतलेल्या शिक्षणामुळे या व्यवसायात अनेक बदल केले. लोखंडी मोठे तराजू काटे बदलवून इलेक्‍ट्रॉनिक काट्यावर धान्याची मोजणी सुरू केली. 

व्यवसायात मला आजोबा-वडील नेहमी सांगायचे ‘जो दिया वो पहले लिखो, जो आया है, वो पहले लो, फिर लिखो’ या वाक्‍याने मला टर्निंग पॉइंट दिला. व्यवसाय करताना तुमच्या मालाचा स्टॉक किती आहे ? तुमची उधारी किती लोकांकडे आहे याचा हिशोब दररोज ठेवला तर लागलीच तुमच्या व्यवसायातील नफा, तोटा कळतो. हे सूत्र मी अवलंबिले. उधार तर द्यायचे मात्र त्याचा चोख हिशोब ठेवून, वसुलीवरही भर दिला. यामुळे व्यवसायात तोटा आलेला नाही.

पूर्वी धान्याची एकावेळी पाच ते दहा क्विंटल एकच व्यक्ती कुटुंबासाठी खरेदी करीत असे. आता कुटुंबात चार किंवा पाच जण असतात. यामुळे पाच क्विंटलने होणारी खरेदी एका क्विंटल, अर्धा क्विंटलपर्यंत खाली आली. चार पाच जणांच्या कुटुंबात कोणाला धान्य स्वच्छ करायला वेळ नाही. यामुळे ग्राहक स्वच्छ धान्य, गुणवत्तेचे धान्य खरेदीस प्राधान्य देतो. ‘मॉल’मध्ये जाऊन त्याच्या पसंतीचे धान्य तो स्वतःच्या हाताने विकत घेतो.

ग्राहकांनाही त्यांना परवडेल अशा किलोच्या पॅकिंगमध्ये धान्य विकण्याचा प्रयत्न असेल. ‘पगारिया फूड्‌स’चे फेसबूक अकाऊंट आहे. ई- मेल आयडी ही आहे. त्यावर अनेक ग्राहक आमच्याशी जुळले आहेत. ते सोशल मीडियाच्या माध्यमातून आम्हाला ऑर्डर देतात. त्यानुसार आम्ही त्यांना धान्य पुरवितो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com