वडापाव विक्रीतून विकीच्या कुटुंबाला मदत

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 नोव्हेंबर 2017

जोगेश्वरी -  देवी विसर्जनावेळी जोगेश्‍वरीतील लोकमान्य टिळक विसर्जन तलावाजवळ विजेचा धक्का बसून विकी पवार (वय २२) या तरुणाचा मृत्यू झाला होता. घरातील कमावत्या मुलाचे निधन झाल्याने पवार कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बिकट झाली होती. त्यामुळे जोगेश्‍वरीतील सामाजिक संघटनांनी एकत्र येऊन केलेल्या वडापाव विक्रीतून एक लाख २५ हजार ६१६ रुपये पवार कुटुंबाला आर्थिक मदत म्हणून दिली. 

विकीच्या मृत्यूनंतर पवार कुटुंबाला आर्थिक मदत करण्यासाठी जोगेश्‍वरीतील जागरूक नागरिक, सामाजिक संस्था मंडळ व रहिवाशांनी एकत्र येऊन ‘एक घास मदतीचा, वडापाव विक्री स्टॉल’ हा उपक्रम हाती घेतला. या उपक्रमांतर्गत त्यांनी श्‍यामनगर मालवणी जत्रेत तलावासमोरच वडापाव विक्री स्टॉल लावला. विकीचा मृत्यू झाला त्या ठिकाणी पहिला वडा ठेवून त्याला श्रद्धांजली वाहिली. नागरिकांनी या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. वडापाव विक्री उपक्रम व नागरिकांनी दिलेल्या मदत निधीतून जमा झालेले १ लाख २५ हजार ६१६ रुपये विकीच्या आई-वडिलांकडे सुपूर्द करण्यात आले.

Web Title: mumbai news vada-pav Jogeshwari