गणेश डुमरे यांचा ‘उल्टाक्षरां’चा राष्ट्रीय विक्रम

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 28 जून 2017

‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्‌स’मध्ये होणार नोंद

नागपूर - नागपुरातील गणेश डुमरे यांनी मंगळवारी उलटी अक्षरे रेखाटण्याचा अनोखा राष्ट्रीय विक्रम रचला. त्यांचा ‘उल्टाक्षरां’चा विक्रम ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस’च्या नव्या आवृत्तीत नोंदविण्यात येईल.

यानिमित्ताने नागपुरात सलग दुसरा दिवस राष्ट्रीय विक्रमाने गाजला.
गणेश नारायणराव डुमरे स्वतः हस्ताक्षरांचे वर्ग घेत असल्यामुळे त्यांची अक्षरांवरील पकड आश्‍चर्याची बाब ठरत नाही. परंतु, उलटी अक्षरे रेखाटण्याचे त्यांचे अनोखे कौशल्य नक्कीच वाखाणण्याजोगे आहे.

लक्ष्मीनगर येथील सिस्फाच्या गॅलरीमध्ये मंगळवारी त्यांनी ही किमया साधली आणि नव्या विक्रमाला गवसणी घातली. इंग्रजी भाषेतील जवळपास १४० शब्द त्यांनी उलटे (अपसाइड डाउन) लिहिले. ते उलटे लिखाण करीत असताना त्यांच्यापुढे बसलेल्या व्यक्तीला सरळ दिसतात.

महात्मा गांधींचे एक इंग्रजीतील वाक्‍य त्यांना या विक्रमी प्रयत्नासाठी दिले होते. जवळपास सात मिनिटांमध्ये त्यांनी एका पानावर हा मजकूर उलट्या अक्षरांमध्ये लिहिला. विशेष म्हणजे गणेश डुमरे यांचा कॅलिग्राफीत हातखंडा आहे. त्यांनी या विक्रमासाठीदेखील खास कॅलिग्राफीचे नीप वापरले. या पेनाने साधारण अक्षरे काढणेदेखील अवघड असते. मात्र, गणेश डुमरे यांनी ते साध्य करून दाखवले. त्यांना ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस’चे प्रमाणपत्र व मेडल प्रदान करण्यात आले. यावेळी डॉ. मनोज तत्त्ववादी, प्रा. संतोष खडसे, प्रा. विनोद मानकर, प्रा. डॉ. संजय पांडे आणि प्रा. शशिकांत ढोकणे यांनी परीक्षण केले. डॉ. तत्त्ववादी यांनी गणेश डुमरे यांच्या विक्रमाची घोषणा केली. गणेश डुमरे यांना विद्यार्थ्यांना हस्ताक्षरांचे धडे देताना आपल्यातील या गुणांची ओळख झाली. त्यानंतर ते सातत्याने त्याचा वापर करू लागले. शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देताना त्यांच्यात विश्‍वास निर्माण झाला आणि त्यानंतर विक्रम रचण्याचे धाडस त्यांनी केले. त्यांचा शिष्य वेदांत पांडे हॅण्डरायटिंग ऑलिम्पियाडमधील राष्ट्रीय विजेता आहे, हे विशेष. यावेळी निखिल मुंडले यांची विशेष उपस्थिती होती.

विद्यार्थ्यांना शिकविताना माझ्यात हा विश्‍वास निर्माण झाला. आज एका पानावर विक्रम केला, पण पाच ते सहा पाने सलग उलटी अक्षरे काढण्याची माझी क्षमता आहे.
- गणेश डुमरे

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: nagpur ganesh dumare national record