नेत्रादानातून दोन अंधाच्या डोळ्यात पेरला उजेड

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 25 मे 2017

भन्ते बोधी विनीत यांनी केले नेत्र आणि त्वचादान 

नागपूर - अर्धेच आयुष्य जागेपणाने जगत असताना अवयवदानातून सत्कर्म करण्याचा संदेश बौद्ध धम्मगुरू भन्ते बोधी विनीत यांनी दिला. मरणोत्तर नेत्रदानातून त्यांनी दोन अंधाच्या डोळ्यात उजेड पेरला तर जळीत रुग्णांसाठी आवश्‍यक असलेली त्वचा दान करीत खऱ्या अर्थाने अवयवदानाच्या ‘सोशल सायन्स’चे महत्त्व समाजाला पटवून दिले. 

इसासनी (ता. हिंगणा) परिसरातील बोधीमग्गो बुद्धविहारात भन्ते बोधी विनीत धम्मप्रसाराचे काम करीत होते. काही दिवसांपूर्वी त्यांचा अपघात झाला.

उपचारादरम्यान त्यांचे लता मंगेशकर हॉस्पिटल येथे निधन झाले. वर्षभरापूर्वी भन्ते बोधी विनीत यांनी डॉ. सुशील मेश्राम यांच्यासमोर अवयवदानाचा प्रसार आणि प्रसार व्हावा, यासाठी अवयव दान करण्यासंदर्भात बोलून दाखवले होते. देहदानाचे इच्छापत्र भरून दिले होते. भन्ते यांची अंतिम इच्छा पूर्ण करण्यासाठी डॉ. मेश्राम यांनी पुढाकार घेतला. भन्ते बोधी विनीत परित्राण पाठ करतानाच बाबासाहेबांच्या विचारांचे  संवर्धन करण्यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन, देहदान, अवयवदान, आंतरजातीय विवाह यावर प्रवचन देत असत. गरीब मुलांना दत्तक घेऊन त्यांना शिक्षण देण्यासाठी ते पुढाकार घेत असत. बुद्धाचे ज्ञान आणि विज्ञानाचा प्रसार करण्यासाठी आयुष्य घालवणारे भन्ते बोधी यांनी आयुष्याच्या अखेरचा श्‍वास घेताना बुद्धाच्या दान पारमितानुसार धम्माचे कर्तव्य पार पाडले आहे. नेत्रदानातून दोन अंध बांधवांच्या अंधार दाटलेल्या डोळ्यांमध्ये आजच उजेड पेरला गेला. 

बुद्ध धम्म विज्ञानवादी आहे. त्यामुळेच भन्ते बोधी विनीत यांनी नेत्र आणि त्वचादान करून बुद्ध धम्माच्या शिकवणीनुसार आधी कल्याण, मध्य कल्याण आणि अंतिमतः ही कल्याणकारी विचारांना वाहून घेतला. भन्तेंच्या नेत्रदानातून दृष्टिहीनांना सुंदर सृष्टी बघण्याचे सामर्थ्य प्राप्त झाले. 
-प्रा. डॉ. सुशील मेश्राम

अवयवदानाची चळवळ गतिशील व्हावी. यातील अज्ञान दूर झाले की, चळवळीला गती येईल. हे अज्ञान दूर  करण्यासाठी भन्तेंनी केलेले नेत्र आणि त्वचा दान मोलाचे ठरणार आहे. भन्तेंच्या या सत्कर्मातून समाजाला प्रेरणा मिळेल. आजची पिढी विज्ञानवादी आहे. यामुळे अज्ञान दूर करण्यास जास्त वेळ लागणार नाही. अवयव दान करताना सरकारी पातळीवर असलेला अंधार दूर व्हावा. 
- भन्ते प्रियदर्शी महाथेरो, कल्पतरू बुद्धविहार, भदन्त आनंद कौसल्यायननगर, नागपूर.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: nagpur news eye donation to two blind people