भाजीपाला विक्रेतीचा मुलगा बनला सीए

उदयकुमार जोशी
रविवार, 29 जुलै 2018

अहमदपूर - जिद्द, मेहनत व सातत्याच्या बळावर शहरातील भाजीमंडईत भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या आशाबाई केंद्रे यांचा मुलगा नारायण हा चार्टर्ड अकाउंटंट (सीए) झाला. आनंदवाडी (ता. अहमदपूर) येथील नारायण केंद्रे याने अतिशय प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत सीएची परीक्षा नुकतीच उत्तीर्ण केली.

त्यांचे वडील बाबूराव केंद्रे यांचे १९९७ मध्ये निधन झाले. त्यांना तीन अपत्ये होती. नारायण त्यावेळी अवघ्या पावणेदोन वर्षांचा होता. पतीच्या मृत्यूमुळे तिन्ही मुलांचा सांभाळ करण्याची जबाबदारी आई आशाबाई यांच्यावर येऊन पडली. मुलांचे पालनपोषण करण्यासाठी अहमदपूर येथील भाजीमंडईत त्यांनी भाजीपाला विकण्याचा निर्णय घेतला. आजही भाजीमंडईत त्यांचे भाजीपाला विक्रीचे दुकान आहे. भाजीपाला विक्रीच्या दुकानावर सुटीच्या काळात नारायण आईला भाजीपाला विक्रीसाठी मदत करायचा. नारायणचे प्राथमिक शिक्षण गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत, तर माध्यमिक शिक्षण अहमदपूर येथे झाले. त्यानंतर उच्च शिक्षणासाठी तो पुण्याला गेला. तेथील कॉलेजमध्ये एम. कॉम पूर्ण करून अकाउंट या विषयात तो नेट परीक्षाही उत्तीर्ण झाला.

‘इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडिया’मार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेत तो नुकताच उत्तीर्ण होऊन सीए झाला आहे. ग्रामीण भागात राहूनही यशाचे शिखर गाठणारा नारायण  वेगळी वाट चोखळणाऱ्या तरुणांसाठी प्रेरणास्रोत बनला आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Narayan Kendre CA Success Motivation