दिव्यांग सागरची ‘एमपीएससी’त भरारी

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 16 डिसेंबर 2017

नाशिक - जन्मत:च अंधत्व असल्यामुळे शिक्षण घेताना येणाऱ्या अनंत अडचणी, वयाची पायरी चढताना येत असलेले नैराश्‍य.. अशा परिस्थितीतीशी झगडत महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या विक्रीकर निरीक्षक परीक्षेत सागर सुभाष ढेरे याने राज्यात अपंग संवर्गात प्रथम क्रमांक पटकाविला आहे. 

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे मागील वर्षी विक्रीकर निरीक्षकपदाच्या १८१ जागांसाठी परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेचा अंतिम निकाल काल (ता. १४) जाहीर झाला. यात नगरमधील नेवासा तालुक्‍यातील लोहगाव येथील सागरने एकशे अठ्ठावीस गुण मिळवून राज्यात प्रथम क्रमांक मिळविला. सागरला डाव्या डोळ्याने दिसत नाही आणि उजव्या डोळ्यानेही अल्प दिसते. शाळेत शिकत असताना सागरला फळ्यावर लिहिलेले अजिबात दिसायचे नाही.

पहिल्या बेंचवर बसूनही फळ्यावरचे दिसत नसल्यामुळे सागर आपल्या मित्राच्या वहीमध्ये पाहून अभ्यास पूर्ण करायचा. असे शिक्षण घेत त्याने बारावी सायन्सपर्यंत शिक्षण पूर्ण केले. नंतर कला शाखेचे शिक्षण पूर्ण केले. सागरचे वडील लोहगाव येथे संत एकनाथ माध्यमिक विद्यालयात शिक्षक आहेत. आई-वडिलांच्या मार्गदर्शनाने सागरने वडाळा येथून बीएडचे शिक्षणही पूर्ण केले. 
या टप्प्यापर्यंत सागरला स्पर्धा परीक्षांविषयी कुठलीही माहिती नव्हती. गेल्या वर्षी मात्र त्याने एका संस्थेत प्रवेश घेऊन चिकाटीने अभ्यास केला आणि यश मिळविले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: nashik news mpsc success by sagar dhere