अखेर बंदूकधारी हातांना लागली हळद

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 4 फेब्रुवारी 2019

अहेरी (जि. गडचिरोली) - पोलिसांनी पुढाकार घेऊन आयोजित केलेल्या सोहळ्यात पाच शरणागत नक्षलवाद्यांसह ५४ आदिवासी जोडपी विवाहबद्ध झाली. पोलिसांच्या या पुढाकाराचे येथे कौतुक होत आहे. 

जिल्हा पोलिस प्रशासन, मैत्री परिवार संस्था नागपूर व साईभक्त सेवक परिवार नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आलापल्ली येथे या विवाहसोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्याला जिल्ह्याचे पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम आणि इतर वरिष्ठ पोलिस अधिकारी उपस्थित होते.

गडचिरोली पोलिस दलामार्फत जिल्ह्यातील आदिवासींसाठी विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. त्याचाच एक भाग म्हणून या सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. दुर्गम भागातील आदिवासी आर्थिक परिस्थितीअभावी आपल्या मुलामुलीचे विवाह थाटात करू शकत नाही. त्यामुळे त्यांची स्वप्नपूर्ती करण्यासाठी पोलिस विभाग व मैत्री परिवार संस्थेतर्फे हा सोहळा घेण्यात आला होता. कार्यक्रमानंतर नवविवाहित जोडप्यांना पोलिस विभाग व मैत्री परिवाराकडून जीवनोपयोगी वस्तू पालकमंत्री आत्राम यांच्या हस्ते देण्यात आल्या.

आदिवासी समाजाच्या कल्याणासाठी शासन व प्रशासन कटिबद्ध आहे. आदिवासी समाजातील विद्यार्थिनींनी उच्चशिक्षण घेऊन समाजाचा विकास करावा. कोणत्याही वाईट मार्गाचा अवलंब करू नये. शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन पालकमंत्र्यांनी केले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Naxalite 54 Trible Couple Marriage Police Motivation