प्रकल्प कचऱ्यापासून वीजनिर्मितीचा... 

प्रकल्प कचऱ्यापासून वीजनिर्मितीचा... 

उच्चशिक्षण घेऊन मोठ्या पगाराची नोकरी असतानाही आपले ज्ञान समाजपयोगी कामांसाठी वापरणारे अनेक जण आपण आसपास पाहतो. नेहा कांदलगावकर हे असेच एक नाव. ‘विवाम ॲग्रोटेक’च्या माध्यमातून त्या कचऱ्यापासून वीजनिर्मितीचा प्रयोग करतात. महाराष्ट्रात असे ३५ प्रकल्प उभारून पर्यावरण रक्षणात त्यांनी खारीचा वाटा उचलला आहे... 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

उच्च शिक्षण झाल्यानंतर त्यांनी जर्मनीमधील एका बॅंकेत नोकरी केली. या नोकरीचा तीन वर्षांत राजीनामा दिला आणि आईने महिलांच्या आर्थिक उन्नतीसाठी सुरू केलेल्या कचऱ्यातून आर्थिक उत्पन्न देणाऱ्या सामाजिक कार्यात सहभागी झाली. त्यांनी स्वतःची ‘विवाम ॲग्रोटेक’ कंपनी सुरू केली व देश-विदेशात कचऱ्यातून वीजनिर्मितीचे प्रकल्प उभे करण्यास सुरवात केली. ही किमया साधली आहे पुण्याच्या नेहा कांदलगावकर यांनी... 

नेहा यांनी एम. कॉम झाल्यानंतर एमबीए केले. त्यानंतर त्या नोकरीसाठी जर्मनीमध्ये गेल्या व तेथे एका बॅंकेत उच्चपदावर नोकरीस सुरुवात केली. मात्र, आईकडून मिळालेली सामाजिक कार्याची प्रेरणा त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. कचऱ्यावर प्रक्रिया याच विषयात काहीतरी काम करण्याची त्यांची इच्छा होती. आई कचऱ्यातून गॅसनिर्मितीचे काम करत होती. महिलांची आर्थिक उन्नती होण्यासाठीचा हा प्रकल्प होता. घरातील कचऱ्यातूनही उत्पन्न मिळू शकते, हे आईने सर्वसामान्य महिलांना दाखवून दिले होते. आईच्या पावलावर पाऊल ठेवत नेहा यांनी २०१०मध्ये विवाम ऍग्रोटेकची स्थापना करत प्रत्यक्ष कामास सुरुवात केली. आई कचऱ्यातून गॅसची निर्मिती करत होती, तर नेही यांनी एक पाऊल पुढे टाकत वीज निर्माण करण्याचा प्रयोग सुरू केला. दोनशे किलोपासून ते अगदी दोन हजार टन कचऱ्यावर प्रक्रिया करत वीजनिर्मिती करणारे अनेक प्रकल्प त्यांनी उभे केले. नेहा यांनी महाराष्ट्रात ३५ ठिकाणी प्रकल्प उभे केले आहेत. साधारण पाच हजार किलो कचऱ्यातून ७०० ते ८०० पथदिवे प्रतिदिन रस्ते उजळवून टाकतील असे ‘स्वंयसिद्ध’ प्रकल्प त्यांनी उभे केले आहेत. विशेष म्हणजे, पथदिव्यांबरोबरच या प्रकल्पांना लागणारी वीजही कचऱ्यातूनच निर्माण केली जाते. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

नेहा यांनी राज्यभरातील सुमारे १७५ महापालिका, पालिकांना अशा पद्धतीचा प्रकल्प अहवाल तयार करून दिला आहे. या अनुषंगाने केंद्र आणि राज्य सरकारकडून येणारे फंड कशा पद्धतीने वापरायचे याबाबत नेहा संबंधितांना त्या मार्गदर्शन करतात. दरम्यान, प्रकल्पासाठी लागणारी मशिनरीही त्या तयार करतात. पुणे जिल्ह्यातील सुमारे १४०० ग्रामपंचायतीसाठी त्यांना जिल्हा परिषदेला प्रकल्प आराखडा (प्रोजेक्‍ट रिपोर्ट) तयार करून दिला आहे. 

देशात विविध ठिकाणी काम करत असताना नेहा यांना ऑस्ट्रेलियासह उत्तर कोरिया, दक्षिण कोरिया, अफगाणिस्तान या ठिकाणाही प्रकल्प उभे केले आहेत. चंद्रपूर येथे महिला कचरा गोळा करून दिवसभरात तीन टन बायोगॅस विकतात. 

सोसायटीतही वीजनिर्मिती शक्य 
आईच्या कामामुळे मला हे काम करायला प्रोत्साहन मिळाले. अगदी सोसायटीच्या पातळीवरही कचऱ्यापासून वीजनिर्मिती करता येते. त्यासाठी 'फूड वेस्ट'ची आवश्‍यकता असते. प्रतिदिन दोनशे किलो कचऱ्यापासून वीजनिर्मितीचा प्रकल्प उभा राहू शकतो. त्यातून सोसायटीचे कॉमन लाइट व अन्य विजेची गरज पूर्ण होऊ शकते. 
- नेहा कालगांवकर, विवाम ऍग्रोटेक 

(शब्दांकन - आशिष तागडे) 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com