मोदी सरकारकडून अनाथ मुलांसाठी 'शिष्यवृत्ती'; मोफत उपचारासाठी देणार 'आरोग्य कार्ड'

Narendra Modi
Narendra Modiesakal
Summary

सरकारनं पीएम केअर्सच्या माध्यमातून व्यावसायिक अभ्यासक्रम आणि उच्च शिक्षणासाठी कर्ज देण्याची व्यवस्थाही केलीय.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) आज (सोमवार) पीएम केअर फॉर चिल्ड्रन योजनेअंतर्गत (PM Cares for Children Scheme) उपलब्ध सुविधांची घोषणा केलीय. बालकांना 5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार मिळणार असल्याचं त्यांनी सांगितलंय. त्यासाठी आयुष्मान हेल्थ कार्डही (Ayushman Health Card) जारी करण्यात आलंय. विशेष म्हणजे, सरकारनं पीएम केअर्सच्या माध्यमातून व्यावसायिक अभ्यासक्रम आणि उच्च शिक्षणासाठी कर्ज देण्याची व्यवस्थाही केलीय.

आज मोदींनी कोरोनामुळं आपल्या प्रियजनांना गमावलेल्या मुलांबद्दल म्हणाले, 'मला माहितीय.. ज्यांनी कोरोनामुळं आपल्या प्रियजनांना गमावलंय, त्यांच्या आयुष्यात हा बदल किती कठीण आहे. अशा आव्हानांमध्ये पीएम केअर्स फॉर चिल्ड्रन हा तुम्हा सर्वांच्या (कोरोनाग्रस्त मुलांच्या) अडचणी कमी करण्याचा एक छोटासा प्रयत्न आहे.' कोणत्याही मुलाला उपचारासाठी काळजी करण्याची गरज नाहीय. पीएम केअर्स फॉर चिल्ड्रनच्या माध्यमातून आयुष्मान हेल्थ कार्ड देखील दिलं जात आहे, यातून 5 लाखांपर्यंतच्या उपचारांची मोफत सुविधा मुलांना मिळेल.'

Narendra Modi
मंत्री रेड्डींच्या ताफ्यावर हल्ला; मंत्र्याच्या दिशेनं भिरकावले बूट, दगड, खुर्च्या

याशिवाय, विद्यार्थ्यांना स्टायपेंड आणि आर्थिक मदत देण्याची घोषणाही सरकारनं केलीय. मोदी पुढं म्हणाले, 'जर एखाद्याला व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी, उच्च शिक्षणासाठी एज्युकेशन लोनची गरज असेल तर पीएम केअर्स त्यातही मदत करेल. इतर दैनंदिन गरजांसाठी विविध योजनांद्वारे दरमहा 4 हजार रुपयांची व्यवस्थाही करण्यात आलीय. अशी मुलं जेव्हा शालेय शिक्षण पूर्ण करतात, तेव्हा भविष्यातील स्वप्नांसाठी आणखी पैशांची गरज भासते. यासाठी 18-23 वर्षांच्या तरुणांना दरमहा स्टायपेंड मिळेल आणि तुम्ही 23 वर्षांचे झाल्यावर तुम्हाला 10 लाख रुपये मिळतील, असंही मोदींनी सांगितलंय. दरम्यान, कोरोना काळात आई-बाबांना गमावलेल्या मुलांना मदत करण्याच्या उद्देशानं PM Cares for Children योजना सुरू करण्यात आलीय.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com