कृतिशील उपक्रमांमधूनच सकारात्मक बदल 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 6 मे 2017

सांगली - छोट्या छोट्या कृतिशील उपक्रमांमधून समाजात सकारात्मक बदलाची भावना तयार होत असते. अमरधाम स्मशानभूमीतील रक्षा नदीऐवजी कुंडीत टाकण्यासाठीचा पुढाकारही अशा बदलासाठीची सुरवात आहे, असे मत जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांनी व्यक्त केली. पोरे फॅमिली ट्रस्टतर्फे बांधलेल्या रक्षा कुंडाच्या लोकार्पणप्रसंगी ते बोलत होते. यावेळी कॉंग्रेसचे गटनेते किशोर जामदार, भाजप नेत्या नीता केळकर, नगरसेवक दिग्विजय सूर्यवंशी, बाळासाहेब काकडे, बाळासाहेब गोंधळे विनायक शेटे, प्रफुल्ल तारळेकर, सुधाकर पिसे, शिवाजीराव ओऊळकर आदी उपस्थित होते. 

गायकवाड म्हणाले,""अलाहाबादला चार पाचवेळा योग आला. तिथे गंगेतील ओंजळभर पाणी घेतले तर त्यात रक्षाच दिसते. गेल्या अनेक वर्षांत गंगेच्या पाण्यातील रक्षेचे हे प्रमाण वाढतच आहे. कोट्यवधींचा खर्च करून नदी स्वच्छतेचा उपक्रम हाती घ्यावा लागतो आहे. मुठभर रक्षेने काय फरक पडणार हे प्रत्येक प्रदूषण घटकाबाबत लागू पडते आणि नद्यांना प्रदूषणाचा विळखा पडतो. नद्यांबद्दलचा दृष्टिकोन बदलणे गरजेचे आहे. रक्षा कुंडासारख्या उपक्रमांमधून ही जाणीव घडावी.'' अविनाश पोरे यांनी स्वागत केले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Positive changes from creative activities