वडिलांच्या मृत्यूनंतर त्वचादान

प्रसाद जोशी
सोमवार, 11 जून 2018

वसई - वडिलांच्या निधनाचे दुःख असतानाच सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून मुलांनी अनोखा निर्णय घेऊन समाजापुढे आदर्श ठेवला आहे. उमेळातील आत्माराम वर्तक (वय ८७) यांचे निधन झाल्यावर त्यांची त्वचा दान करण्याचा निर्णय कुटुंबीयांनी घेतला.

वसई - वडिलांच्या निधनाचे दुःख असतानाच सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून मुलांनी अनोखा निर्णय घेऊन समाजापुढे आदर्श ठेवला आहे. उमेळातील आत्माराम वर्तक (वय ८७) यांचे निधन झाल्यावर त्यांची त्वचा दान करण्याचा निर्णय कुटुंबीयांनी घेतला.

उमेळा ग्रामपंचायत असताना उपसरपंपद भूषवलेले आत्माराम यशवंत वर्तक वयाच्या ८२ व्या वर्षापर्यंत गायीचे दूध काढून घरोघरी नेऊन देण्याचे काम करत असत. अडल्यानडल्यांना मदत करण्यासाठी ते सदोिदत तत्पर असायचे. वृद्धापकाळाने त्यांचा शुक्रवारी (ता. ८) मृत्यू झाल्यावर वर्तक कुटुंबाप्रमाणे संपूर्ण गावावर शोककळा पसरली. त्यांचे पुत्र नगरसवेक मनीष वर्तक, संदेश वर्तक, मुलगी राजश्री (हर्षा) पाटील यांनी वडिलांचे त्वचादान करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी महाराष्ट्र देहदान अवयव संघाचे संस्थापक पुरुषोत्तम पाटील यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर मसीना स्किन बॅंकेचे डॉक्‍टर जितेश पटेल आणि अन्य डॉक्‍टरांना बोलावण्यात आले. नेत्रदान करण्याची इच्छा होती; मात्र वय आड आले. वयाच्या ८० व्या वर्षापर्यंत नेत्रदान करता येऊ शकते; मात्र आत्माराम वर्तक यांचे वय जास्त असल्याने ते शक्‍य झाले नाही, अशी खंत त्यांच्या कुटुंबीयांना आहे. वडील शरीराने गेले असले; तरी त्यांच्या त्वचेचा वापर गरजू रुग्णांना व्हावा, या हेतूने वर्तक कुटुंबीयांनी त्वचादानाचा निर्णय घेतला. त्याबद्दल त्यांचे कौतुक केले जात आहे. वडील आत्माराम वर्तक यांनी पाच वर्षांपूर्वी एक चिठ्ठी लिहिली होती. 

माझे जे अवयव समाजाच्या उपयोगी येऊ शकतील, ते मृत्यूनंतर दान करावेत, असे वडिलांनी नमूद केले होते. त्यानुसार त्यांची त्वचा दान करण्याचा निर्णय आम्ही घेतला, असे आत्माराम वर्तक यांचे पुत्र मनीष वर्तक यांनी सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Positive story Skin Donate vartak family decided to donate the skin