दिव्यांग असूनही केली परिस्थितीवर मात

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 21 जानेवारी 2019

पुणे - पोलिओमुळे पाचव्या वर्षीच दोन्ही पायांना आयुष्यभराचे अपंगत्व आले. यामुळे शिक्षणासाठी अडचणी यायला लागल्या. प्रत्येक पावलावर समाजातील लोकांनी हीन आणि दीनदुबळा अशा नजरेने पाहिले. पण यावर मात करायचीच अशी मनाशी खूणगाठ बांधून शिक्षणाची कास धरली. राज्यशास्त्र विषयाची पदवी आणि कायद्याचे शिक्षणही पूर्ण कले. समाजकल्याण विभागातील कनिष्ठ लिपिक पदाची परीक्षा उत्तीर्ण होऊन कनिष्ठ लिपिक ते राजपत्रित अधिकारी असा तब्बल ३६ वर्षांचा सरकारी नोकरीतील प्रवास रामदास म्हात्रे यांनी पूर्ण केला. 

या काळात स्वतः दिव्यांग असल्याने दिव्यांगांना येणाऱ्या अडचणींची जाणीव त्यांना होती. आपल्याला सहन कराव्या लागणाऱ्या हाल अपेष्टा इतर दिव्यांगांच्या वाट्याला येऊ नयेत म्हणून त्यांनी जागृत अपंग संघटनेच्या माध्यमातून सामाजिक काम सुरू केले. दिव्यांगांचे हक्क, दिव्यांगांची मार्गदर्शिका - शासन निर्णय २०१६ अशी पुस्तके लिहून कायदेशीर प्रश्‍न समाजासमोर मांडले. म्हात्रे एवढ्यावरच थांबले नाहीत. डॉ. बाबा आढाव, ज्येष्ठ साहित्यिक मंगेश तेंडुलकर, नारायण सुर्वे यांच्या उपस्थितीत दिव्यांगांचा स्नेहमेळावा, परिषदा घेऊन प्रश्‍नांना वाचा फोडली. आमदार बच्चू कडू यांनी दिव्यांगांसाठी स्थापन केलेल्या प्रहार अपंग क्रांती आंदोलनाचेही म्हात्रे सदस्य आहेत. सरकारी नोकरीतील निवृत्तीनंतर आता कुटुंबासोबतच पूर्णवेळ दिव्यांगांच्या प्रश्‍नांसाठी लढण्याचे त्यांचे काम अविरत सुरू आहे. त्यांचे कार्य पाहून १९८४ मध्ये अपंग राज्य पुरस्कार आणि १९८७ मध्ये अपंग राष्ट्रीय पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात  आले आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ramdas mahatre story