जिद्दी रूपेशने साकारले ‘कमांडर’चे स्वप्न! 

प्रतीक्षा लोहार
मंगळवार, 10 जुलै 2018

जळगाव - मनात जिद्द, दृढ आत्मविश्‍वास आणि मेहनत करण्याची तयारी असेल तर कोणतेही स्वप्न सहज साध्य करता येऊ शकते. याच त्रिसूत्रीच्या बळावर जळगावातील सर्वसामान्य कुटुंबातील रूपेशसिंह पाटील या तरुणाने प्रतिकूल परिस्थितीत अवघ्या २६ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी सेंट्रल आर्मी पोलिस फोर्सची परीक्षा उत्तीर्ण होत ‘असिस्टंट कमांडर’पदी स्थान निश्‍चित केले आहे. शहरातील पिंप्राळा परिसरातील दांडेकरनगर येथील रहिवासी असणाऱ्या रुपेशसिंग रमेश पाटील या विद्यार्थ्याने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या सी. ए. पी. एफ. (सेंट्रल आर्मी पोलिस फोर्स) या परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात यश मिळविले आहे.

जळगाव - मनात जिद्द, दृढ आत्मविश्‍वास आणि मेहनत करण्याची तयारी असेल तर कोणतेही स्वप्न सहज साध्य करता येऊ शकते. याच त्रिसूत्रीच्या बळावर जळगावातील सर्वसामान्य कुटुंबातील रूपेशसिंह पाटील या तरुणाने प्रतिकूल परिस्थितीत अवघ्या २६ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी सेंट्रल आर्मी पोलिस फोर्सची परीक्षा उत्तीर्ण होत ‘असिस्टंट कमांडर’पदी स्थान निश्‍चित केले आहे. शहरातील पिंप्राळा परिसरातील दांडेकरनगर येथील रहिवासी असणाऱ्या रुपेशसिंग रमेश पाटील या विद्यार्थ्याने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या सी. ए. पी. एफ. (सेंट्रल आर्मी पोलिस फोर्स) या परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात यश मिळविले आहे. या यशानंतर त्याची ‘असिस्टंट कमांडर’ पदासाठी निवड झाली आहे. रूपेश हा अवघ्या २६ वर्षांचा असून, इतक्‍या लहान वयात मोठे यश मिळविल्याने त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. रुपेशचे वडील रमेश पाटील हे शहरातील जेडीसीसी बॅंकेत शाखा व्यवस्थापक पदावर कार्यरत आहे तर आई कांचन पाटील या गृहिणी आहे.

आवडीतून गवसला मार्ग
रूपेश याला लहानपणापासूनच अभ्यासाची आवड होती. त्याने प्राथमिक शिक्षण बालमोहन विद्यालयात तर माध्यमिक शिक्षण हे आर. आर विद्यालयात पूर्ण केले. यानंतर बारावीपर्यंत मू. जे. महाविद्यालयात शिक्षण घेतले. पुढे उच्च शिक्षण घ्यावे, यासाठी त्याने पुण्यातील पी.आय.सी.टी महाविद्यालयात इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतले हे शिक्षण घेत असताना तो स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करू लागला व त्या आवडीतूनच त्याने आपले स्वप्न साकारले.

स्वयंम अध्ययनातून यश
स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत असताना फक्त क्‍लासेसमध्ये अभ्यास न करता रूपेश याने स्वयंम अध्ययनावर भर दिला. दररोज घरी चार तासापेक्षा अधिक अभ्यास करत स्वत:च्या नोट्‌स तयार केल्या व यूपीएससी (सीएपीएफ) परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात यश मिळविले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: rupesh sinha patil Commander dreamed