esakal | कलेच्या आवडीतून साकारला बालगणेश...
sakal

बोलून बातमी शोधा

कलेच्या आवडीतून साकारला बालगणेश...

कलेच्या आवडीतून साकारला बालगणेश...

sakal_logo
By
रजनीकांत साळवी

प्रभादेवी - लहानपणापासून कलेची आवड आणि गणपतीवरील निस्सीम श्रद्धा असलेल्या साहिल सावंतने आपल्या घरीच असलेल्या कार्यशाळेत बालगणेशाची सुंदर मूर्ती साकारली आहे. शिवडीमध्ये राहणारा साहिल साठे महाविद्यालयामध्ये बारावीत शिकतो. कलेची आवड जोपासण्यासाठी त्याने घरासमोर मूर्तिशाळा सुरू करून गणेशमूर्ती बनवण्याची हौस पूर्ण केली. त्याच्या कलेला परिसरातील सर्व जण दाद देत आहेत.

साहिलने दुसरीत असल्यापासूनच विविध आकारांत गणेशाच्या वेगवेगळ्या कलाकृती बनवण्याचा सातत्याने प्रयत्न केला. कॉलेज आणि अभ्यास सांभाळून प्रसिद्ध मूर्तिकार विशाल शिंदे यांच्याकडे गणेशमूर्ती बनवण्याचे धडे त्याने घेतले. शिंदे यांच्या विविध गणेशमूर्ती पाहून मी भारावून गेलो आणि त्यातूनच प्रेरणा घेत मूर्ती साकारण्यास सुरुवात केली, असे साहिल सांगतो.

सुरुवातीला गणेशमूर्ती बनवण्यासाठी जागा मिळत नव्हती. मात्र, आई-वडिलांच्या पाठिंब्यामुळे घरासमोरच शेड उभारून, साहिलने तिथे पर्यावरणपूरक अशा शाडूच्या मूर्ती बनविण्यास सुरुवात केली. कुठल्याही साचाशिवाय हाताने केवळ दीड फुटांची मूर्ती बनवण्याला साहिलने प्राधान्य दिले. 

गणपतीची विविध रूपे 
साकारायची असल्याचे तो सांगतो. कॉलेज आणि अभ्यासातून वेळ काढून कधी सकाळी, कधी दुपारी तर कधी रात्र जागून साहिल गणपती बनतो, असे साहीलचे वडील मनीष सावंत यांनी सांगितले.

शिवाजी महाराजांचीही प्रतिमा साकारली
कॉलेजच्या एका प्रदर्शनातही साहिल सावंतने गणेशाची सुंदर मूर्ती साकारली होती. अनेकदा छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा त्याने बनवली आहे. अधूनमधून कार्यशाळेत मूर्तीचे टचअप करण्यासाठी साहिलला अनेक जण बोलावतात, असे मनीष सावंत यांनी सांगितले.

loading image