esakal | महाबळेश्वरच्या पूरग्रस्तांना नाम फाउंडेशन करणार मदत
sakal

बोलून बातमी शोधा

Naam Foundation

महाबळेश्वर तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात शेती आणि शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.

महाबळेश्वरच्या पूरग्रस्तांना नाम फाउंडेशन करणार मदत

sakal_logo
By
अभिजीत खुरासणे

सातारा : महाबळेश्वर तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे (Mahabaleshwar Taluka Heavy Rain) मोठ्या प्रमाणात शेती आणि शेतकऱ्यांचे (Farmers) नुकसान झाले असून, शेतीचे झालेले नुकसान भरून करण्यासाठी मोठ्या आर्थिक मदतीची आणि कणखर मानसिकतेची गरज असल्याच्या पार्श्‍वभूमीवर १०५ गाव समाज सामाजिक संघटनेने पुढाकार घेत संस्थेचे कार्याध्यक्ष डी. के. जाधव व सामाजिक कार्यकर्ते बी. व्ही. शेलार यांनी पुणे येथे नाम फाउंडेशनच्या (Naam Foundation) कार्यालयात फाउंडेशनच्या मकरंद अनासपुरे (Makrand Anaspure) यांची भेट घेऊन त्यांच्याकडे मदतीची मागणी निवेदनाद्वारे केली. फाउंडेशननेही मदत करण्याची ग्वाही दिलीय.

विविध सामाजिक संस्थांच्या माध्यमातून शेतजमीन दुरुस्त करण्यासाठी १०५ गाव समाज सामाजिक संघटनेने शासन दरबारी अधिकारी व पदाधिकाऱ्यांना निवेदने देऊन सातत्याने पाठपुरावा करण्याचे काम गतीने सुरू केले आहे. याचाच एक भाग म्हणून नाम फाउंडेशनकडे शेतजमीन पूर्ववत करण्यासाठी मदतीची मागणी करण्यात आली. या वेळी नाम फाउंडेशन व १०५ गाव समाज कार्यकर्ते यांच्यात सविस्तरपणे चर्चा झाली. कामाचे स्वरूप कसे असेल, काम सुरू कधी केले पाहिजे, कोठे प्राधान्यक्रमाने काम करता येईल या विषयी चर्चा झाली. लवकरच प्रत्यक्ष पाहणी करून काम सुरू करू, असे आश्वासन त्यांनी दिल्याची माहिती श्री. जाधव यांनी दिली.

हेही वाचा: मदन भोसलेंची मनमानी, आक्षेपार्ह व्यवहार

loading image
go to top