
खोजेवाडीत अलीकडच्या काळात 'हरित खोजेवाडी' हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
नागठाणे (जि. सातारा) : 'हरित खोजेवाडी' प्रकल्पाला यशस्वीतेचे बळ देताना गावातील युवकांनी झाडांना पाणी देत होळी साजरी केली. तरुणाईकडून साकारल्या जात असलेल्या या उपक्रमाचे विविध स्तरांतून कौतुक होत आहे.
खोजेवाडी हे सातारा तालुक्यातील गाव. अलीकडच्या काळात गावात "हरित खोजेवाडी' हा उपक्रम राबविण्यात येत आहे. गावाभोवती असलेला डोंगर हिरवागार करण्यासाठी गावातील युवकांनी पुढाकार घेतला आहे. त्याला ग्रामस्थ, ग्रामपंचायत तसेच विविध संस्थांचाही हातभार लाभताना दिसत आहे. लोकसहभागाचे मोठे बळदेखील या उपक्रमास मिळत आहे. गेल्या वर्षीच्या फेब्रुवारी महिन्यात या उपक्रमाचा प्रारंभ झाला असल्याची माहिती कृष्णत घोरपडे यांनी दिली. त्यानंतर लॉकडाउन काळात मोठ्या प्रमाणात झाडांचे रोपण करण्यात आले. योग्य काळजी अन् संवर्धन यामुळे आता या झाडांची चांगलीच वाढ झाली आहे.
प्रतिवर्षाप्रमाणे बावधनची बगाड यात्रा उत्साहात; प्रशासनाच्या नियमांना ठेंगा
उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर झाडे जगावीत यासाठी युवकांकडून कसोशीने प्रयत्न सुरू आहेत. त्या दृष्टीने सर्व झाडांना पाणी घालून युवकांनी होळीचा सण साजरा केला. गावातील विरेंद्र कळसकर यांनी झाडांसाठी स्वतः पाण्याचा टॅंकर देऊन आगळी सामाजिक बांधिलकी जपली. आयुष जाधव, दीपक जाधव, संकेत देशमुख, प्रशांत घोरपडे, श्रेयस घोरपडे, राज कदम, बाळासाहेब कदम, विराज कळसकर, गणेश मदने, अभय मदने आदी युवकही या उपक्रमात सहभागी झाले. युवकांच्या या प्रयत्नाचे विविध स्तरांतून कौतुक होत आहे.
केंद्राला सहकारी साखर कारखानदारी मोडीत काढायची आहे का?; गृहराज्यमंत्र्यांचा मोदी सरकारला सवाल
सयाजी शिंदे यांची भेट
सह्याद्री वनराई प्रकल्पप्रमुख अन् ख्यातनाम अभिनेते सयाजी शिंदे यांनीही या प्रकल्पास भेट दिली आहे. गावातील युवकांचा वाढदिवस हा झाड दिवस म्हणून साजरा केला जातो. गावातील व्यक्तीचे निधन झाल्यानंतर झाड लावून त्याच्या स्मृती जपल्या जात असल्याची माहिती कृष्णत घोरपडे यांनी यावेळी दिली.
संपादन : बाळकृष्ण मधाळे