दातृत्वाला सलाम...सैनिकांमुळे मोगरवाडी प्राथमिक शाळा बनली टॅबयुक्त!

Satara
Satara
Updated on

नागठाणे (जि. सातारा) : स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून जिल्ह्यातील सैनिकांनी एकत्र येत मोगरवाडी या दुर्गम भागातील शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना टॅबची आगळी भेट दिली आहे. सैनिकांच्या या अनोख्या शैक्षणिक तळमळीतून ही शाळा टॅबयुक्त बनली आहे. सैनिकांच्या या शैक्षणिक बांधिलकीचे कौतुक होत आहे. 

मोगरवाडी ही पाटण तालुक्‍यातील लहानशी वाडी. डोंगरउंचावरील या वाडीतील ग्रामस्थांनी लोकसहभागातून शाळेच्या इमारतीची उभारणी केली आहे. त्यामुळे मोगरवाडीचे नाव सर्वदूर पोचले आहे. दीपक मगर, विजय पवार हे शिक्षक विविध शैक्षणिक उपक्रम शाळेत प्रभावीपणे राबवितात. त्याचीच दखल घेत समाजातील विविध घटक या शाळेसाठी मदतीचा हात सातत्याने पुढे करतात. सध्याच्या काळातील "ऑनलाइन शिक्षणा'चे महत्त्व ओळखून जिल्ह्यातील सैनिकांनी या शाळेस टॅबची आगळी भेट दिली.

त्यासाठी जाखणगाव (ता. खटाव) येथील उमेश शिंदे यांचा पुढाकार महत्त्वपूर्ण ठरला. त्यांच्या मित्रांचा सहभाग मोलाचा ठरला. त्यात शशिकांत वाघमोडे, विजय जगदाळे, दीपक खोत, उमेश साळुंखे (सर्व सातारा), नीलेश बाबर (सोनगाव), निखिल शेलार (खेड), दीपक कोकरे (पिलाणी), तुषार यादव (दुर्गळवाडी), किरण लोरे (मोगरवाडी), निखिल जगदाळे (उंब्रज), विजय गोडसे (काटकरवाडी), संदीप कदम (फलटण), विशाल माने (म्हसवड), विजय कदम (दिघी), प्रवीण कदम (सांगली), विलास भगत (बुलडाणा), रितेश मोरे (रायगड), प्रशांत महाजन (शिरूर), सुदर्शन पाटील (कोल्हापूर), नवनाथ करुंजले (रांजणगाव), स्वप्नील मोरे (कल्याण) या सैनिकांचा सहभाग उल्लेखनीय ठरला.

यापूर्वी शाळेसाठी तीन लाखांची मदत देणारे बृहन्मुंबई महानगरपालिका मुंबईचे सहायक अभियंता सुहास नेमाणे यांनीही शाळेस दोन टॅब भेट दिले. सातारा येथील सामाजिक कार्यकर्ते फिरोज पठाण यांनीही दोन टॅबची मदत केली. शरद दिवेकर या शिक्षकाकडूनही शाळेस एक टॅब भेट मिळाला. प्रियांका राजेंद्र वाकडे हिच्या पहिल्या कमाईतील मदतीतूनही एक टॅब उपलब्ध झाला. सातारा येथील स्टार एज्युस्मार्ट ई-लर्निंगचे राहुल तारळेकर यांनी सर्व टॅबमध्ये इयत्तानिहाय अभ्यासक्रम इन्स्टॉल करून दिला आहे. 


शिक्षणाधिकाऱ्यांकडून प्रारंभ 

मोगरवाडीच्या या टॅबयुक्त शाळेचा प्रारंभ जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी (प्राथमिक) प्रभावती कोळेकर यांच्या हस्ते झाला. यावेळी ग्यानप्रकाश फाउंडेशनचे प्रशांत भोसले, विकास जानुगडे यांची उपस्थिती होती. केंद्रप्रमुख निवास निकम यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना टॅबचे वितरण करण्यात आले. 

संपादन : पांडुरंग बर्गे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com