अवघ्या ऐंशीव्या वर्षी मिळवली दुसरी पीएच.डी.

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 26 सप्टेंबर 2018

पुणे - वय वर्षे अवघे ऐंशी, या वयातही शिकण्याची ऊर्मी असलेल्या डॉ. विक्रम मेहता यांनी दुसरी पीएच.डी. नुकतीच पूर्ण केली आहे. शिक्षणाला वयाची अट आणि अडसर नसतो हेच डॉ. मेहता यांनी दाखवून दिले आहे. केवळ ‘पीएच.डी.’ करून ते थांबले नाही, तर आपल्या शिक्षणाचा समाजाला उपयोग व्हावा म्हणून ते प्रयत्नशील आहेत.

पुणे - वय वर्षे अवघे ऐंशी, या वयातही शिकण्याची ऊर्मी असलेल्या डॉ. विक्रम मेहता यांनी दुसरी पीएच.डी. नुकतीच पूर्ण केली आहे. शिक्षणाला वयाची अट आणि अडसर नसतो हेच डॉ. मेहता यांनी दाखवून दिले आहे. केवळ ‘पीएच.डी.’ करून ते थांबले नाही, तर आपल्या शिक्षणाचा समाजाला उपयोग व्हावा म्हणून ते प्रयत्नशील आहेत.

गुजरातमधील झव्हेरी मंगलश्री डिस्पेन्सरी ट्रस्टचे डॉ. मेहता यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून ‘अ स्टडी ऑफ ॲडमिनिस्ट्रेटिव्ह प्रॉब्लेम्स ऑफ पब्लिक ट्रस्टस्‌ मॅनेजिंग हेल्थकेअर सेक्‍टर इन गुजरात (१९९०-२०१४)’’ या विषयात पीएच.डी. पूर्ण केली आहे. आपल्या पीएच.डी.चा समाजाला उपयोग व्हावा, म्हणून त्यांनी गरजू रुग्णांना मिळणाऱ्या आरोग्य सुविधांचे सर्वेक्षण केले. त्यासाठी ठिक-ठिकाणच्या रुग्णालयांमध्ये जाऊन पाहणी केली, अडचणी जाणून घेतल्या. त्या सोडविण्यासाठी आपल्या प्रबंधातून निष्कर्षही मांडले. आरोग्य सुविधा, योजनांचा लाभ रुग्णांना मिळावा, यासाठी आता ते आपल्या प्रबंधाच्या आधारे सरकारचे दरवाजे ठोठावणार आहेत.

विश्‍वस्त संस्थांमार्फत चालविण्यात येणाऱ्या रुग्णालयातील प्रशासकीय कामकाज, व्यवस्थापन, अडचणी, सुविधा आणि त्यावरील उपाय याचा अभ्यास डॉ. मेहता यांनी पीएच.डी. दरम्यान केला आहे. बृहन्महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्सचे (बीएमसीसी) प्राचार्य डॉ. सी. एन. रावळ हे डॉ. मेहता यांचे पीएच. डी.चे मार्गदर्शक आहेत.

रुग्णांना सरकारी आणि विश्‍वस्त संस्थांमार्फत देण्यात येणाऱ्या आरोग्य विषयक योजनांचा लाभ घेताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. ग्रामीण भागात वैद्यकीय सुविधा देण्यासाठी डॉक्‍टर जायला तयार होत नाहीत. अशा डॉक्‍टरांना प्रवास खर्च, उच्च शिक्षणासाठी क्रेडिट पॉइंट मिळावे, तसेच ट्रस्टमधील पदाधिकाऱ्यांना वयाचे आणि किती ठिकाणी विश्‍वस्त म्हणून असावे याचे बंधन घालावे, अशा सूचना महाराष्ट्र आणि गुजरात सरकारपर्यंत लवकरच पोचविणार आहे. 
- डॉ. विक्रम मेहता


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Second Phd in 80 years old dr vikram mehta Success Motivation