हालाखीच्या परिस्थितीतून शोएब झाला रेल्वेत तिकीट निरीक्षक

राजकुमार शहा
सोमवार, 4 जून 2018

आई वडीलाचे छत्र नाही, मामासह आजी आजोबानी सांभाळ केला विवाह झाला पदरी दोन मुले व एक मुलगी ही अपत्ये पाच माणसांच्या हातातोंडाची गाठ पडण्यासाठी काही दिवस सायकलवर गारेगार विकले. पण त्यात भागेना म्हणुन 1985 पासुन शेतकऱ्याकडुन निलावात भाजी विकत घेऊन ती विकण्यास सुरवात केली.

मोहोळ : घरची परिस्थीती अत्यंत हलाखीची घरात दुसरे कोणीही कमवते नाही प्रपंचासाठी पाण्यापासुन सर्व विकत गारेगार व शेतकऱ्याकडुन निलावात भाजी विकत घेऊन ती दिवसभर मंडईत बसुन विकणे केवळ दोन ते अडीच हजार भांडवलावर मुलाचे शिक्षण केले. आज मुलगा शोएब हा रेल्वेत तिकीट निरीक्षक या पदावर विराजमान झाल्याने गेल्या 33 वर्षाच्या भाजी विकल्याच्या कष्टाचे चिज झाल्याची भावना मोहोळ येथील मुबारक आतार शेख यांनी व्यक्त केली. 

आई वडीलाचे छत्र नाही, मामासह आजी आजोबानी सांभाळ केला विवाह झाला पदरी दोन मुले व एक मुलगी ही अपत्ये पाच माणसांच्या हातातोंडाची गाठ पडण्यासाठी काही दिवस सायकलवर गारेगार विकले. पण त्यात भागेना म्हणुन 1985 पासुन शेतकऱ्याकडुन निलावात भाजी विकत घेऊन ती विकण्यास सुरवात केली. प्रपंच सांभाळत मुलांच्या शिक्षणाचाही खर्च भागवावा लागे. शोएबला बीएससीपर्यत तर मुलगी शाहिस्ता हिला बीए. पर्यत शिकविले. शैक्षणिक खर्च वाढल्याने शोएब ने तो ज्या वसतिगृहात राहतो. त्या ठिकाणी भाजी पुरविण्याचा ठेका घेतला त्यामुळे कसातरी खर्चाला हातभार लागला. 

शिक्षण पुर्ण झाल्यावर शोएबने रेल्वेच्या जागा निघाल्यावर परिक्षा दिली. पहिल्या परिक्षेत उत्तीर्ण झाला सिग्नल व दुरसंचार विभागात खलाशी म्हणुन काम मिळाले सहा वर्षानंतर तिकीट निरीक्षकाची दुसरी परिक्षा दिली. त्यात उत्तीर्ण झालो. आज तिकीट निरीक्षक या पदावर कार्यरत आहे. वडीलांचे कष्ट व माझी जिद्द यामुळेच मी यशाचे शिखर काबीज केल्याचे शोएबने सांगीतले, मी जातीय भेद मानत नाही. नागनाथ माझे श्रदास्थान असल्याचे त्याने सांगितले मी भाजी विकुन मुलाला टीसी केले हे मुबारक अभिमानाने सांगतात.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shoaib Shaikh become Ticket collector in railway

टॅग्स