डीएसके विश्‍व भास्करा सोसायटीत सौरऊर्जा प्रकल्प

Solar project at DSK World Bhaskara Society
Solar project at DSK World Bhaskara Society

पुणे - सर्व पदाधिकारी आणि सभासदांनी ही कल्पना उचलून धरली. संबंधित ठेकेदाराशी संपर्क साधून माहितीही घेतली. पण मूळ मुद्दा पैशाचा होता. तेव्हा सोसायटीच्या ठेवींवर कर्ज काढले आणि हा विषय मार्गी लागला. दोन महिन्यांत हा प्रकल्प पूर्ण झाला. आमची कल्पना प्रत्यक्षात उतरल्याचा हा आनंद शब्दांमध्ये सांगता येण्यासारखा नव्हता. या प्रकल्पासाठी ‘एमएसईडीएल’ने सहकार्य केल्याने काम सुकर झाले. पंचवीस ‘केव्हीपी’च्या या प्रकल्पासाठी एकूण अठरा लाख रुपये खर्च आला. आमच्या सोसायटीत एकूण ३१८ सदनिका आहेत. हा प्रकल्प होण्यापूर्वी सोसायटीच्या सार्वजनिक वीजवापराचे बिल दरमहा ५५ हजार रुपये येत असे. सौरऊर्जा प्रकल्प कार्यान्वित झाल्यानंतर पहिल्याच महिन्यात वीजबिल शून्य आले आणि आमचे परिश्रम फळाला आले.

या प्रकल्पासाठी सरकारने तीन लाख रुपयांची सबसिडी दिल्याने सोसायटीवरील आर्थिक बोजा थोडा हलका झाला, हे आवर्जून नमूद करावेसे वाटते. हा प्रकल्प साकारण्यासाठी सोसायटीचे सर्व पदाधिकारी आणि सभासदांनी सहकार्य केल्याने एक विधायक उपक्रम सुरू झाला याचा आनंद आणि अभिमानही वाटतो. आमच्या सोसायटीतील सौरऊर्जा प्रकल्प यशस्वीपणे सुरू झाल्याचे पाहून डीएसके विश्‍वमधील ‘सप्तसूर’ आणि ‘चंद्रमा’ सोसायटीतील सभासदांनी प्रकल्पाला भेट देऊन माहिती घेतली आणि स्वतःच्या सोसायटीतही असा प्रकल्प राबविण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. अन्य सोसायट्यांनीही अशाच प्रकारचे पाऊल उचलल्यास वीज बचत होण्याबरोबरच सोसायटीच्या खर्चातही मोठी बचत होऊ शकेल.   

धायरीतील ‘डीएसके विश्‍व’मधील भास्करा सहकारी गृहनिर्माण सोसायटीचा कारभार पाहताना सोसायटीतील सार्वजनिक वापराच्या वाढत्या बिलावर काय मार्ग काढावा, असा विचार आम्ही पदाधिकारी करीत होतो. तेव्हाच एका नियतकालिकेमध्ये ‘सौरऊर्जा यंत्रणेमुळे पंचवीस वर्षे वीज मोफत’ अशी जाहिरात वाचनात आली. त्यामुळे आमच्या विचारांना चालना मिळाली. 
 दामोदर जोशी, सचिव, भास्करा हाउसिंग सोसायटी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com