"उन्हाळ्यात एक सत्कार्य करुया पक्ष्यांना पाणी पाजूया"

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 4 एप्रिल 2018

राशीन : वाढत्या उन्हाच्या काहीलीत पाण्यासाठी कासावीस होणाऱ्या पक्ष्यांची तहान भागविण्यासाठी जनजागृती सामाजिक युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून "या उन्हाळ्यात एक सत्कार्य करूया पक्ष्यांना पाणी पाजूया" या उपक्रमातंर्गत पाणी ठेवण्यासाठी साडे तीन हजार प्लास्टिक व मातीच्या भांडयांचे जगदंबा विद्यालायातील विद्यार्थ्यांना आज वाटप करण्यात आले.

महावीर जयंती व संत कैकाड़ी महाराज जयंतीनिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन जनजागृती तर्फे करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी कावळवाड़ीचे सरपंच गणेश करे हे होते.व्यासपीठावर डॉ. महेंद्र थोरात, जैन समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष नवीन बोरा, उद्योजक मेघराज बजाज, मनसेचे शहराध्यक्ष अशोक टाक, देशमुखवाडीचे माजी उपसरपंच मालोजी भिताडे, सागर कांबळे, शिवसेनेचे विभागप्रमुख संतोष काशीद, अशोक सोनवणे, डॉ. शिवाजी काळे, डॉ. विजय चव्हाण, समीर दोशी, राकेश भंडारी, संदीप दिकेकर, अमोल जाधव, दादा काळे आदी उपस्थित होते.

यावेळी अध्यक्षीय भाषणात करे यांनी सामाजिक जाणीवा जिवंत ठेवण्याचा हा स्तुत्य उपक्रम जनजागृती प्रतिष्ठानने राबविला असल्याचे सांगत त्यांनी प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांचे कौतुक करीत प्रत्येक विद्यार्थ्यांनी मिळालेल्या भांडयांमध्ये मूक्या पक्ष्यांसाठी दररोज पाण्याची सोय करावी असे आवाहन केले.तसेच जगदंबातील विद्यार्थ्यांना शुद्ध पिण्याचे पाण्यासाठी यश कल्याणी ग्रामीण सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून आर.ओ.फिल्टर देण्याचे आश्वासन करे यांनी यावेळी दिले.
प्रास्ताविक जनजागृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष शरद आढाव यांनी केले.सूत्रसंचालन सचिन डमरे यांनी केले.आभार सचिन साळवे यांनी मानले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: in summer kept water for birds