सुरेंद्र राव यांनी घेतलाय कला रुजवण्याचा वसा

ओंकार धर्माधिकारी
गुरुवार, 14 मार्च 2019

राव हे मूळचे मध्यप्रदेशमधील. जबलपूर येथील ललित कला संस्थेमधून त्यांनी चित्रकलेचे धडे गिरवले. पुढे याच महाविद्यालयात ते शिक्षक झाले. उपप्राचार्य पदापर्यंत पोचले; पण या सगळ्यामध्ये त्यांच्यातील कलाकार महाविद्यालयाच्या अभ्यासक्रमात रमला नाही. नोकरीच्या रूपाने आलेल्या जीवनातील शाश्‍वततेचाच त्यांना कंटाळा आला. मग अवघ्या ३२ व्या वर्षी नोकरी साडून पूर्णवेळ चित्रकलेचाच ते विचार करू लागले.

कोल्हापूर - कला महाविद्यालयातील उपप्राचार्य पदाची नोकरी अवघ्या तिशीतच सोडायची. गावागावांमध्ये जाऊन मुलांना गोळा करायचे. त्यांना चित्रे काढायला शिकवायची. त्या चित्रांची प्रदर्शने गावातील पारावर भरवायची. गावागावांतील कलाकारांना भेटायचे, त्यांच्याशी गप्पा मारायच्या. त्यांच्याकडील माहिती संकलित करायची. वर्षानुवर्षे हे काम करणाऱ्या या अवलियाचे नाव आहे सुरेंद्र राव. ‘फोटो ऑन व्हिल’ या छायाचित्र प्रदर्शनाच्या निमित्ताने ते कोल्हापुरात आले आहेत. 

राव हे मूळचे मध्यप्रदेशमधील. जबलपूर येथील ललित कला संस्थेमधून त्यांनी चित्रकलेचे धडे गिरवले. पुढे याच महाविद्यालयात ते शिक्षक झाले. उपप्राचार्य पदापर्यंत पोचले; पण या सगळ्यामध्ये त्यांच्यातील कलाकार महाविद्यालयाच्या अभ्यासक्रमात रमला नाही. नोकरीच्या रूपाने आलेल्या जीवनातील शाश्‍वततेचाच त्यांना कंटाळा आला. मग अवघ्या ३२ व्या वर्षी नोकरी साडून पूर्णवेळ चित्रकलेचाच ते विचार करू लागले. कला ही परमेश्‍वराची निर्मिती. ती मुळात निसर्गातच आहे 

आपण फक्त त्याला कलात्मक दृष्टिकोनाची जोड द्यायची हा त्यांचा कलात्मक विचार. म्हणून मग त्यांना कलाप्रसाराचा आपला मार्ग निवडला. याबद्दल सुरेंद्र राव सांगतात, गावोगावी अनेक चांगले कलाकार आहेत. त्यांची चित्रेही सुंदर आहेत. पण ती आर्ट गॅलरीमध्ये पोचत नाहीत. मुळात आर्ट गॅलरी हे कलेच्या प्रसाराचे माध्यम नाही. कारण समाजातील ८० टक्के माणसे तेथे येतच नाहीत. मग लोक जिथे जातात तिथे चित्रप्रदर्शन भरवले पाहिजे. तेथेही अनेक सौंदर्यपूर्ण जागा असतात. गावाचा पार, बाजारहाट इथल्या स्थानिक साधनांचा वापर करून आम्ह प्रदर्शन भरवतो. कारण कला ही संग्रहालयांसाठी नाही तर ती जनमानसासाठी आहे.

सौंदर्य शोधणे ही कला
सुरेंद्र राव यांचा कलेकडे पाहण्याचा दृष्टिकोन व्यावसायिक नाही. त्यांच्या वागण्याबोलण्यात, सार्वजनिक जीवनातील वावरण्यात कृत्रिमपणा नसतो. चित्रकला ही श्रीमंतांच्या घरातील भिंती किंवा शोकेस सजवण्यासाठी नाहीत. ती परमेश्‍वराने मानवाला दिलेली देणगी आहे. निसर्ग खूप सुंदर आहे. त्यातील सौंदर्य शोधणे आणि मांडणे ही खरी कला आहे. चित्रकार चित्रे काढतात; पण ती सामान्य माणसापर्यंत पोचत नाहीत. ही खंत राव बोलून दाखवतात. आपला कलाविषय दृष्टिकोन सांगताना राव म्हणतात, ‘‘माँ अच्छी रोटी बनाती है, और बच्चों को खिलाती है, अच्छा है इसलीये अलमारीमें नही रखती.’


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Surendra Rao devotion to Art special