esakal | सफाई कर्मचाऱ्यांची मुलगी बनली तहसीलदार I Tahsildar
sakal

बोलून बातमी शोधा

Monika kamble

सफाई कर्मचाऱ्यांची मुलगी बनली तहसीलदार

sakal_logo
By
अजित घस्ते

सहकारनगर - परिस्थिती माणसाला संघर्ष करायला शिकवते आणि संघर्षातून धैर्याने पुढे जाताना जीवनाचे अनेक स्थित्यंतर घडत असतात. अशाच परिस्थितीत पर्वती दर्शन मधील वडील सफाई कर्मचारी असताना मोनिका कांबळे हिने स्पर्धा परीक्षेमध्ये सलग चौथ्यांदा यश संपादन करीत तहसीलदार पद मिळवले आहे.

काल नुकत्याच एमपीएससीच्या स्पर्धा परीक्षेच्या निकालात मोनिका कांबळेची तहसीलदार पदी  निवड झाली आहे. यापूर्वी 2018 मध्ये कर निर्धारण प्रशासकीय अधिकारी(उप मुख्याधिकारी) तर 2019 मध्ये राज्य विक्रीकर निरीक्षक म्हणून निवड झाली होती. 2020 मध्ये उपशिक्षण अधिकारी म्हणून निवड झाली, तर 2021 मध्ये तहसीलदार पदी निवड झाली. अशी सलग 2018 ते 2021 चौथ्यांदा स्पर्धा परीक्षेत यश संपादन करीत स्पर्धा परीक्षेत यश मिळवण्याचा मानस राखला आहे.

स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या समोर आदर्श निर्माण केला आहे. त्यात पर्वती दर्शन वसाहतमध्ये राहून एक मुलगी सलग चौथ्यांदा स्पर्धा परीक्षेत यश संपादन करीत आहे हे कौतुकास्पद व गौरवाची गोष्ट आहे. यामुळे मंगळवारी रात्री स्पर्धा परीक्षेचा निकाल लागताच पर्वती दर्शन मधील नागरिकांनी मोनिका कांबळे या मुलीची मिरवणूक काढून आनंद उत्सव साजरा केला. पर्वती दर्शनमधील नागरिकांनी पेढे भरवुन कौतुक केले. यावेळी स्थानिक नगरसेवक, मान्यवर व्यक्तींनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. यावेळी नगरसेवक सुभाष जगताप, नगरसेवक रघुनाथ गौडा, माजी नगरसेवक अशोक हरणावळ, डॉ. नारायण डोलारे, मंगेश शहाणे, अभिजीत टेंबे, निखिल पवार, संजय केंजळे इ. घरी जाऊन सत्कार करून अभिनंदन केले.

यावेळी मोनिका कांबळे म्हणाली, जीवनात यशस्वी होण्यासाठी भोवतालचे वातावरण अनुकूल असावे लागते असे काही नसते.जिद्दीने व प्रामाणिकपणे कठोर अभ्यास केल्यास यश हमखास मिळते.हे मी अनेकदा दाखवून दिले आहे.घरचा पाठिंबा असेल तर कोणालाही यश संपादन करता येते.स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी परीक्षेत खचून न जाता सातत्याने जिद्द व चिकाटीने अभ्यास केल्यास हमखास यश मिळवले शक्य आहे हे मी करून दाखवले आहे.सद्या राज्य कर निरीक्षक म्हणून येरवडा जीएसटी ऑफिसमध्ये रुजू असून यापुढे असाच स्पर्धा परीक्षेचा अभ्यास चालू ठेऊन यूपीएससी परीक्षा देऊन जिल्हाधिकारी होण्याचे माझे स्वप्न आहे.

loading image
go to top