esakal | #FridayMotivation : दहा महिन्यांत त्यांनी केले २९ गड-किल्ले सर
sakal

बोलून बातमी शोधा

किल्ले अणघई - ज्ञानप्रबोधिनी नवनगर विद्यालयातर्फे आयोजित दुर्गजागर मोहिमेअंतर्गत जिल्ह्यातील २९ गड-किल्ल्यांवर भ्रमंती करण्यात आली.

प्राधिकरणातील ज्ञानप्रबोधिनी नवनगर विद्यालयाच्या चाळीस विद्यार्थ्यांनी दुर्गजागर मोहिमेअंतर्गत पुणे जिल्ह्यातील २९ गड-किल्ले दहा महिन्यांत सर केले. या मोहिमेत मुलांनी निसर्गात मनसोक्त भटकंतीचा आनंद घेतला. अनुभवी तज्ज्ञ मार्गदर्शकांकडून गड-किल्ल्यांवरील इतिहासही जाणून घेतला.

#FridayMotivation : दहा महिन्यांत त्यांनी केले २९ गड-किल्ले सर

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पिंपरी - प्राधिकरणातील ज्ञानप्रबोधिनी नवनगर विद्यालयाच्या चाळीस विद्यार्थ्यांनी दुर्गजागर मोहिमेअंतर्गत पुणे जिल्ह्यातील २९ गड-किल्ले दहा महिन्यांत सर केले. या मोहिमेत मुलांनी निसर्गात मनसोक्त भटकंतीचा आनंद घेतला. अनुभवी तज्ज्ञ मार्गदर्शकांकडून गड-किल्ल्यांवरील इतिहासही जाणून घेतला. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

या मोहिमेच्या समारोप प्रसंगी दुर्ग अभ्यासक प्र. के. घाणेकर, एव्हरेस्टवीर श्रीहरी तापकीर उपस्थित होते. दोघांनीही मुले आणि पालकांचे कौतुक केले. या प्रकारच्या मोहिमा प्रत्येक शाळांकडून झाल्या पाहिजेत, अशी अपेक्षा व्यक्त केली. ज्ञानप्रबोधिनीचे केंद्र प्रमुख वा. ना. अभ्यंकर, केंद्र उपप्रमुख मनोज देवळेकर यांनीही मुलांचे कौतुक केले. प्रत्येक विद्यार्थ्याला मावळी पगडी, शरभाची प्रतिकृती आणि पदके प्रदान करण्यात आली. 

चिंचवडमधील गड-किल्ले सेवा समितीचे नीलेश गावडे आणि रघुनाथ एरंडे यांच्या मार्गदर्शनाखाली या मोहिमेला सुरुवात झाली. पहिल्या टप्प्यात सोप्या श्रेणीतील किल्ल्यांची निवड करण्यात आली. दर रविवारी किंवा शालेय सुटींच्या दिवशी दुर्गभ्रमंती करण्यात आली. मोहिमेत १४ मुली, २६ मुले आणि त्यांचे ८१ पालक सहभागी झाले. तिन्ही ऋतूंमध्ये मोहीम चालू राहिली. किल्ल्यांची रचना, त्यांचा इतिहास, किल्ल्यावरील घटक, प्रस्तरारोहण साहित्य, जैवविविधता यांचा परिचय मुलांना करून देण्यात आला. प्रवास वर्णन लेखन आणि छायाचित्र स्पर्धाही घेण्यात आली. 

सतीश पवार, सचिन शिंदे, सोमशंकर डाके, अरुण मरळ, शीतल शिंदे, राम तरस आदी पालकांचे विशेष सहकार्य लाभले.

loading image