esakal | 'त्यांनी"जपली माणुसकी; लॉक डाऊन मध्येही जेवणाची सोय

बोलून बातमी शोधा

Food

आधी कर्फ्यु आणि अचानक जाहीर झालेल्या लॉक डाऊनमुळे नोकरदार आणि बॅचलर्सवर उपासमारीची वेळ आली. मात्र समाजभान ठेऊन काही युवक एकत्र आले आणि त्यांनी भुकेलेल्यांची भूक जाणली.

'त्यांनी"जपली माणुसकी; लॉक डाऊन मध्येही जेवणाची सोय
sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पिंपरी - आधी कर्फ्यु आणि अचानक जाहीर झालेल्या लॉक डाऊनमुळे नोकरदार आणि बॅचलर्सवर उपासमारीची वेळ आली. मात्र समाजभान ठेऊन काही युवक एकत्र आले आणि त्यांनी भुकेलेल्यांची भूक जाणली.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

थेरगाव सोशल फाऊंडेशनच्या माध्यमातून  रविवार (ता.22) पासून हा उपक्रम राबविला जात आहे. आतापर्यंत दुपार व सायंकाळ सत्रात 60 हून अधिक जेवणाचे डब्बे त्यांनी रोज पुरविले आहेत. चिखली, वाल्हेकर वाडी, नखाते वस्ती, डांगे चौक, चिंचवड या भागात ही सेवा सुरू आहे. यात काही एमपीएससी परीक्षा देणारे विद्यार्थी आहेत.  साठ रुपयाला एक डब्बा आहे. 'ना नफा ना तोटा' या तत्वावर हे काम सुरू केले आहे . 

मात्र, दोन वेळचे जेवण बनविण्यासाठी ज्या मावशी मदत करत होत्या. त्यांची तब्बेत अचानक बिघडली आहे. त्यामुळे हे युवकच स्वयंपाक बनवत आहेत. यातील एकालाही भाकरी किंवा पोळी बनविता येत नसल्याने मोठी पंचाईत झाली आहे. तरीही ते पुलाव भात व मसाले भात बनवून देत आहेत. हा उपक्रम विनामूल्य त्यांनी सुरू ठेवला आहे. पोलीस अडवणूक करत असल्याने डब्बे पोहचविणे देखील अवघड झाल्याचे अनिकेत पिंगळे यांनी सांगितले.

हे आहेत ते तरुण 
अनिकेत प्रभु, राहुल सरोदे , निलेश पिंगळे, शंनतनु तेंलग, यश कुदळे, अंकुश कूदळे, श्रीकांत धावारे, संकेत हलगेकर, संदेश दिघे, 
बंटी तेलंग, अनिल घोडेकर.

मी कंपनीत कंत्राटी कामगार आहे. मूळ गाव अहमदनगर आहे . मला उशिरा सुट्टी मिळाली. गावाकडे जाता आलं नाही. रूममध्ये दोघे राहतो. असं काही होईल याची कल्पनाच न्हवती. रूममध्ये जेवणाची कोणतीही सोय नाही. दोन वेळ मेस सुरू होती.  मात्र, दोन दिवस दूध बिस्किटे खाऊन काढली. आता थोडा आधार तरी मिळाला आहे.
- महेश पोपळे, चिंचवड, नोकरदार