esakal | 'फ्रेंडशिप' असावी तर अशी! अमेरिकन मैत्रिणीची पूरग्रस्तांना लाखमोलाची मदत
sakal

बोलून बातमी शोधा

Teacher Vaishali Kadam

गेल्या महिन्यात महाबळेश्वर तालुक्याला पावसाचा तडाखा मोठ्या प्रमाणात बसला.

अमेरिकन मैत्रिणीची पूरग्रस्तांना लाखमोलाची मदत

sakal_logo
By
सुनील शेडगे

सातारा : एका शिक्षिकेच्या शब्दाखातर तिच्या अमेरिकेतील (America) मैत्रिणीने अतिवृष्टीने बाधित झालेल्या गावांना तब्बल दोन लाख ८० हजार रुपयांची मदत केली आहे. मैत्रीच्या नात्यातील हे आगळे सामर्थ्य सर्वांसाठीच कौतुकाचा विषय ठरले आहे. प्राथमिक शिक्षिका वैशाली कदम (Teacher Vaishali Kadam) अन् त्यांची अमेरिकन मैत्रीण (American Friend) शालू जेसवाणी (Shalu Jaiswani) यांच्या मैत्रीची ही कथा. सौ. कदम या महाबळेश्वर तालुक्यातील (Mahabaleshwar Taluka) जावळी येथील प्राथमिक शाळेत कार्यरत आहेत. आजवर विविध शैक्षणिक उपक्रमांची त्यांनी प्रभावीपणे अंमलबजावणी केली आहे.

सामाजिक बांधिलकीबाबत त्या सातत्याने आघाडीवर असतात. गेल्या महिन्यात महाबळेश्वर तालुक्याला पावसाचा तडाखा मोठ्या प्रमाणात बसला. विशेषतः दुर्गम भागात असलेल्या जावळी, दरे, हरोशी, कुंभरोशी, हातलोट यांसारख्या गावांची त्यात मोठी वाताहात झाली. जनजीवन विस्कळित झाले. शेतीची प्रचंड प्रमाणात हानी झाली. या पार्श्वभूमीवर येथील परिस्थितीची माहिती सौ. कदम यांनी शालू जेसवाणी यांना दिली. त्या सध्या अमेरिकेत वास्तव्यास असतात. मध्य प्रदेशात इंदूरलाही त्यांचा व्यवसाय आहे. सौ. कदम अन् शालू जेसवाणी यांच्यातील मैत्रीची वीण घट्ट आहे.'व्हॉट्‌सॲप'च्या माध्यमातून त्या परस्परांच्या संपर्कात असतात. सौ. कदम यांच्याकडून लोकांच्या हलाखीचे वर्णन ऐकून शालू जेसवाणी व्यथित झाल्या.

हेही वाचा: 'भारतासारख्या गरीब देशात 60 कोटी लसीचा टप्पा गाठला जाणार नाही'

त्यांनी तत्काळ आपद्‌ग्रस्तांना मदत देण्याचे ठरविले. त्यातून दोन लाख ८० हजार रुपयांच्या जीवनावश्यक साहित्याचे ५०० किट तयार करण्यात आले. त्याचे वाटप हानी झालेल्या गावांत करण्यात आले. या उपक्रमासाठी वाडा कुंभरोशी येथील मदर फार्म हाउसचे श्री. साधूवाणी, श्री. सागर (इंदूर), जनार्दन कदम, रवींद्र वाईकर, संतोष चोरगे, सुनील सावंत तसेच विविध गावांतील ग्रामस्थांचे सहकार्य लाभले. केंद्रप्रमुख दिलीप जाधव, गटशिक्षणाधिकारी आनंद पळसे यांनी अभिनंदन केले.

हेही वाचा: चर्चा तर होणारच! जिल्हा बँकेचं राजकारण तापलं; BJP-NCP आमदार एकत्र?

मैत्रीने कमाविलेला विश्वास

वैशाली कदम अन् शालू जेसवाणी यांची मैत्री चार-पाच वर्षांची. त्या दोघी दोन-तीन वेळा प्रत्यक्ष भेटल्या आहेत. मात्र, परस्परांशी असलेली मैत्री अन् विश्वास यामुळे त्यांच्यातील नाते अधिक दृढ बनले आहे. त्यामुळॆच केवळ परिस्थितीचे वर्णन ऐकून शालू जेसवाणी यांनी इतकी मोठी रक्कम पाठविली.

loading image
go to top