esakal | कोरोना रुग्णांच्या सेवेतून चैतन्य अन्‌ समाधान
sakal

बोलून बातमी शोधा

Vaishnavi-Rathi

कोरोना होणे टळणार नाही, अशी परिस्थिती आणि आकडे सांगत आहेत; मग ते जनसेवा करताना झाले तर काय बिघडले? या सेवेमुळे मिळणारी उर्जा, चैतन्य, सकारात्मकता आणि समाधान पुढील आयुष्यासाठी शिदोरी ठरेल.

कोरोना रुग्णांच्या सेवेतून चैतन्य अन्‌ समाधान

sakal_logo
By
वैष्णवी राठी, पुणे

आजच्या घडीला कोरोनाच्या कामासाठी स्वयंसेवकांची नितांत गरज आहे. विशी ओलांडलेल्या तरुणाईने पुढाकार घेत या कार्यास स्वतःला जोडून घेतले पाहिजे. कोरोना होणे टळणार नाही, अशी परिस्थिती आणि आकडे सांगत आहेत; मग ते जनसेवा करताना झाले तर काय बिघडले? या सेवेमुळे मिळणारी उर्जा, चैतन्य, सकारात्मकता आणि समाधान पुढील आयुष्यासाठी शिदोरी ठरेल.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

बाबांच्या सांगण्यावरून कर्वे रस्त्यावरील गरवारे महाविद्यालयातील कोविड सेंटरमध्ये कोरोनाबाधित रुग्णांसाठी स्वयंसेविका म्हणून काम करण्याचे मी निश्‍चित केले. तेव्हा अनेक हितचिंतकांच्या भुवया उंचावल्या; पण ‘राष्ट्र प्रथम’ या संकल्पनेस अनुसरत मी जाण्यास तयार झाले. या सेवाकार्यात स्वतः कोरोनाग्रस्त होण्याची शक्‍यता असल्याने तिथे राहून सात दिवस सेवाकार्य करणे, त्यानंतर स्वतः सात दिवस क्वारंटाइन राहणे, हेे या कार्याचा स्वरूप. तिथे पहिली गाठ पडली वीणा पवानी यांच्याशी. तेथील व्यवस्थापनाची जबाबदारी त्यांच्याकडे होती. त्यांनी प्रेमळपणे आम्हा सर्व स्वयंसेवकांना आपापल्या जबाबदाऱ्या समजावून सांगितल्या. तिथे येणाऱ्या रुग्णांच्या चेहऱ्यावर अनामिक भीती तरंगताना दिसे. त्यांना भयमुक्त करावे यावरही मला काम करावेसे वाटत होते. त्यांना काय हवे नको ते पाहणे, त्यांचे जेवण खाणे, औषधे, काढा इतर गोष्टींकडे लक्ष देणे, याव्यतिरिक्त मोठे आणि महत्त्वाचे काम होते ते त्यांना मानसिक बळ देण्याचे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

काम करताना त्यांच्यासोबत एक भावनिक नाते निर्माण होत असल्याचे मला जाणवू लागले. रुग्णांना पाणी भरून ठेवणे, नित्योपयोगीचे साहित्य पोचविणे, ॲडमिशन तसेच डिस्चार्ज सुरळीत होईल, याची काळजी घेणे ही माझी नित्यनेमाची कामे. पीपीई किट घालून मी त्यांचे पल्स, ऑक्‍सिजन तसेच तापमान तपासत असे. असेच एका मधुमेही ज्येष्ठ नागरिकास तातडीची वैद्यकीय सेवा मिळाल्याने त्यांना मोठा दिलासा मिळाला. या रुग्णात लहान मुलेही होती. त्यांना चित्रकला किंवा रेषाचित्र काढण्यास मी ही प्रवृत्त करत असे. कामाचे तास संपल्यावर आपली वैयक्तिक कामे ऑनलाइन किंवा फोनद्वारे करण्याची मुभा आम्हा सर्वांना होतीच. आमच्या स्वास्थ्याची पूरेपूर काळजीही तेथे घेण्यात येत होती. एकूण समूहात खेळीमेळीचे वातावरण असल्याने हा हा म्हणता सात दिवस निघून गेले. आता मी नियमाप्रमाणे घरी क्वारंटाइन आहे.

loading image
go to top