विद्यार्थ्यांसाठी आता फिरते वाचनालय

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 30 जानेवारी 2019

चिपळूण -  मुलांत वाचनाची गोडी वाढावी म्हणून मुलांना छान छान गोष्टीच्या पुस्तकांच्या फिरत्या वाचनालयाचा उपक्रम शहरात पहिल्यांदाच होत आहे. शहरालगतच्या दहा शाळांतील मुलांना वाचनाचा आनंद घेता येणार आहे. मानस सेवाभावी संस्थेने त्यासाठी पुढाकार  घेतला आहे. 

जि. प. शाळांमधील मुलांना गोष्टीच्या पुस्तकांच्या वाचनाची आवड निर्माण व्हावी, या उद्देशाने ही मोबाईल व्हॅनमध्ये पुस्तके व संगणक ठेवले आहेत. दोन हजार पुस्तकांची बॅंक केली आहे. त्यामध्ये प्राण्याच्या गोष्टी, चित्रमय गोष्टी, कॉमिक्‍स, कार्टुन गोष्टी, बोधकथा, इसापनीती आदी पुस्तकांचा समावेश आहे. 

फिरत्या ग्रंथालयासाठी सारस्वत बॅंकेने वाहन उपलब्ध करून दिले. तालुक्‍यात अलोरे, मुरादपूर,  कोळकेवाडी, पेढे-पानकरवाडी, मालघर, कोंढरताम्हाणे, मिरवणे, कालुष्टे गावातील शाळांना हे फिरते वाचनालयाचे वाहन भेट देईल. वाचनाद्वारे विद्यार्थ्यांची आवांतर वाचनाची गोडी व वाचन, श्रवण, लेखन क्षमता विकसित होतील. ही पुस्तके मुलांना दिल्यानंतर त्याचे वाचन इतर मुुलांसमोर करायचे आहे. वाहनामध्ये लॅपटॉप आहे. हा मुलांना स्वतः हाताळून गुगल सर्चही करता येणार आहे.

मुलांना स्वतः शाळेचा अभ्यासक्रम शोधून त्यावर काम करता येईल. तसेच संवादातून इंग्रजी बोलण्याच्या ध्वनीफिती लावल्या जातील. मुलांनी स्वतः शब्दाचे उच्चार शिकून इंग्रजीत संवाद करणे अपेक्षित आहे. या सर्व उपक्रमासाठी या वाहनासोबत प्रफुल्ल घोले, मयुरी तटकरे, योगिता रजाटे, सोनाली कदम हे शिक्षक योगदान देत आहेत.

या फिरत्या ग्रंथालयाच्या माध्यमातून आनंददायी वाचन देण्याचा प्रकल्प मुलांना कृतिशील व आनंददायी ठरेल.
-प्रफुल्ल घोले, सहभागी शिक्षक

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: van library for students