पाणी बचत प्रयोगाची लक्‍झेंबर्ग विद्यापीठाच्या प्रदर्शनासाठी निवड

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 24 मार्च 2019

बेसीनमध्ये हात धुवेपर्यंत पाणी वाया जाते. त्याऐवजी हा नळ पायाने नियंत्रित केला तर हात धुवेपर्यंत वाया जाणाऱ्या पाण्यात बचत या प्रयोगात सिद्ध केली. ऑनलाईन पद्धतीने प्रयोगाची माहिती दिल्यानंतर लक्‍झेमबर्ग विद्यापीठाने आंतरराष्ट्रीय विज्ञान प्रदर्शनासाठी पाचारण केले.
- सुरेश पाध्ये,
मार्गदर्शक शिक्षक

चिपळूण - येथील गद्रे हायस्कूलच्या विद्यार्थिनी अनुष्का संदीप भागवत व वैष्णवी अनंत मोरे यांनी पाणी बचतीवर केलेल्या प्रयोगाची निवड लक्‍झेंबर्ग विद्यापीठाने (जर्मनी) आयोजित केलेल्या विज्ञान प्रदर्शनासाठी झाली आहे. मंगळवारी (ता. १९) आंतरराष्ट्रीय विज्ञान प्रदर्शनात प्रयोग सादर करण्यासाठी या दोघी रवाना झाल्या.४२ देशांतील विद्यार्थी या जागतिक विज्ञान प्रदर्शनात त्यांचा प्रयोग मांडणार आहेत.

गद्रे हायस्कूलने सलग दुसऱ्या वर्षी ही संधी साधली. बेसीनवर हात धुण्यासाठी नळ चालू केल्यावर हात धुवेपर्यंत पाणी वाया जाते. बेसीनचा नळ पायाने चालू बंद केला तर वाया जाणाऱ्या पाण्यापैकी ६६ टक्के पाण्याची बचत होते, हे त्यांनी प्रयोगाद्वारे सिद्ध केले. 

याप्रमाणे दैनंदिन वापरात पायाने बेसीन नियंत्रित केले तर महिन्याकाठी ९०० लिटर पाणी वाचू शकते, हे आकडेवारीने प्रयोगात सिध्द झाले. याप्रमाणे पाणी बचत शक्‍य होते. दोघांनी इलेक्‍ट्रोमॅग्नेटिक इंडक्‍शनद्वारे म्हणजे मेकॅनिकल ऊर्जेचे रूपांतर दुसऱ्या प्रकारच्या ऊर्जेमध्ये होऊ शकते, हे विज्ञानाचे तत्त्व वापरले.

जगभरातील बेसीन वापरामध्ये या प्रयोगाचा वापर झाल्यास लाखो लिटर पाण्याची बचत होऊ शकते. सर्वत्र सहजपणे हे तंत्र वापरात येऊ शकते. या विद्यार्थिनींना विज्ञान शिक्षक तुषार पाध्ये यांनी मार्गदर्शन केले. विद्यार्थिनींनी निरोप देण्यासाठी संस्थाध्यक्ष डॉ. विनय नातू, विजयकुमार ओसवाल, मुख्याध्यापक शेंडे आदी उपस्थित होते. 

बेसीनमध्ये हात धुवेपर्यंत पाणी वाया जाते. त्याऐवजी हा नळ पायाने नियंत्रित केला तर हात धुवेपर्यंत वाया जाणाऱ्या पाण्यात बचत या प्रयोगात सिद्ध केली. ऑनलाईन पद्धतीने प्रयोगाची माहिती दिल्यानंतर लक्‍झेमबर्ग विद्यापीठाने आंतरराष्ट्रीय विज्ञान प्रदर्शनासाठी पाचारण केले.
- सुरेश पाध्ये,
मार्गदर्शक शिक्षक


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: water savings experiment selected for exhibition in the University of Luxembourg